Vijay Karanjkar & Dada Bhuse Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shivsena Politics : नाशिकला तीन मंत्री, सरकार कोणाचीही दखल घेईना!

Sampat Devgire

Maharashtra Politics : जिल्ह्यातील जनता टाहो फोटत आहे. दुष्काळाने लोक हैरान झाले आहेत. पिण्याच्या पाण्याची तीव्र स्थिती झाली आहे. तरीही त्यावर काहीच कसे केले जात नाही?. जिल्ह्यातील अन्न, नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, पालकमंत्री दादा भुसे, केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांनी संपूर्ण जिल्हा दुष्काळी जाहीर करा, असे पत्र दिल्यानंतरही शासन त्यांचे ऐकत नाही, याचा अर्थ काय होतो, असा प्रश्न विरोधकांनी केला आहे. ( Even there are three Ministers of ruling party, no relief for Farmers in Drought)

दुष्काळाच्या प्रश्नावर राज्य शासनाने (Maharashtra Government) प्रशासनाच्या चाकाेरीत राहून निर्णय घेतले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात (Nashik) दुष्काळ असलेल्या भागात नाराजी आहे. शिवसेनेने (Shivsena) या प्रश्नावर भाजप (BJP) तसेच शिंदे गटाला लक्ष्य केले आहे.

जिल्ह्यात पुरेसा पाऊस झालेला नाही. जिल्ह्यातील दारणा, गंगापूर व त्या प्रकल्पातील उपप्रकल्पांतील धरणांत पुरेसा पाणीसाठा नाही. मात्र, प्रशासन ही धरणे भरल्याचे सांगून जायकवाडी प्रकल्पासाठी पाणी सोडण्याची शिफारस करते. दुसरीकडे पहिल्या टप्प्यात केवळ तीन तालुक्यांत दुष्काळ जाहीर होतो, हा राज्य शासनाने नाशिक जिल्ह्याशी केलेला दुजाभाव आहे. त्याची झळ जनतेला व शेतकऱ्यांना सोसावी लागते आहे, अशी टीका शिवसेना (उद्धव ठाकरे) जिल्हाप्रमुख करंजकर यांनी केली.

यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यातील मध्यम धरण प्रकल्प कसेबसे भरले आहेत. धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने कमी पाऊस होऊनही ही धरणे लवकर भरतात, ही वस्तुस्थिती आहे. यंदा अत्यल्प पर्जन्यमानामुळे या भागातील आदिवासी शेतकऱ्यांचे ५० टक्के उत्पादन घटले आहे. द्राक्षबागा, भाजीपाला घेणारे शेतकरी, अगदी निफाड, देवळा, चांदवड, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, नांदगाव या तालुक्यांत अतिशय बिकट स्थिती आहे. त्याचा राज्य शासनाने विचार का केला नाही, असा प्रश्न करंजकर यांनी केला.

जिल्ह्यात विचारधारा सोडून, तत्त्वाशी प्रातारणा करीत, जनतेने दिलेला कौल विसरून भाजपने राजकीय पक्षांचे आमदार फोडले. बहुसंख्य आमदार आज सत्तेबरोबर आहेत. विकासाच्या गप्पा मारणाऱ्या या आमदारांना दुष्काळी जनतेला दिलासा देण्याची कुवत राहिलेली नाही, जनता हे सर्व उघड्या डोळ्यांनी पाहते आहे, या आमदारांना लवकरच त्याचे उत्तर मिळेल.

राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील यांच्याशी जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी संपर्क करून दुष्काळाबाबत अवगत केलेले आहे. पालकमंत्री दादा भुसे यांनी स्वतः सबंध जिल्हा दुष्काळी जाहीर करावा, अशी सूचना केली होती. केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन सबंध नाशिक जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी केली. अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ उपसमितीच्या बैठकीला हजर होते. नाशिकचे तीन मंत्री असूनही सबंध नाशिक जिल्ह्यात दुष्काळ का जाहीर होऊ शकला नाही, असा प्रश्न करंजकर यांनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT