rajabhau waje hemant godse sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Lok Sabha Exit Poll Results 2024 : नाशकात ठाकरे करून दाखविणार, राजभाऊ वाजे दिल्लीला जाणार?

Akshay Sabale

Rajuabhau Waje Vs Hemant Godse : लोकसभा निवडणुकांचे 'एक्झिट पोल' आज जाहीर झाले. यामध्ये महाराष्ट्रात महायुतीला अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळत आहे. महाविकास आघाडीने मुसंडी मारली आहे.

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर 'टीव्ही 9 पोलस्ट्राट'च्या एक्झिट पोलनुसार नाशिक मतदारसंघात विद्यमान खासदार आणि शिवसेना मुख्यमंत्री शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे ( Hemant Godse ) पिछाडीवर आहेत. येथून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार राजाभाऊ वाजे ( Rajabhau Waje ) आघाडीवर आहेत.

नाशिक मतदारसंघात महाविकास आघाडीने हा मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सोडला होता. शिवसेनेने 17 मार्चला वाजे यांची उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, खासदार गोडसे यांची उमेदवारी अगदी उशिरा, निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यावर जाहीर झाली होती. त्याचा फटका खासदार गोडसे यांना बसलेला दिसतो.

राज्यातील लोकसभा निवडणुकीतील मतदानाविषयी हे सर्वेक्षण करण्यात आले आहे. एका वृत्तवाहिनीवरील बातमी नुसार राज्यात महाविकास आघाडीने लक्षणीय कामगिरी केली आहे.

महायुतीने राज्यात '45 प्लस' असा नारा दिला होता. त्यासाठी भारतीय जनता पक्षाने शिवसेनेच्या एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस यांना बरोबर घेतले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राज्यातील सर्व मंत्रिमंडळातील सदस्य प्रचारात आघाडीवर होते. मात्र, त्यांना अपेक्षित उद्दिष्ट गाठता आलेले नाही.

( Edited By : Akshay Sabale )

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT