Maharashtra Exit Poll 2024 : महाराष्ट्रात मोदींचा करिष्मा नाहीच; पवार- ठाकरेंचंच नाणं खणखणीत?

Sharad Pawar And Uddhav Thackeray : एक्झिट पोलच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात भाजपच्या मिशन 45 ला धक्का बसल्याचे दिसत आहे. गेल्या निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीला 41 जागा मिळाल्या होत्या.
Sharad Pawar, Uddhav Thackeray
Sharad Pawar, Uddhav ThackeraySarkarnama

Maharashtra News : एक्झिट पोलचे अंदाज येऊ लागले आहेत. देशात पुन्हा एनडीएचे सरकार येणार असे चित्र हे एक्झिट पोल सांगत असून, महाराष्ट्रात मात्र भाजपच्या मिशन 45 ला धक्का बसत असल्याचा अंदाज आहे. हे अंदाज खरे ठरले तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे हेच राज्यात भाजपच्या मार्गातील सर्वात मोठा अडसर ठरलेले असतील. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत महायुतीची वाट बिकट होणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

गेल्या पाच वर्षांत राज्यात झालेल्या राजकीय घडामोडींच्या केंद्रस्थानी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शरद पवार हेच राहिले. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. त्याला भाजप जबाबदार आहे, असा संदेश गेला. शिवसेना-भाजप युतीला 2019 च्या निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाले होते, मात्र प्रत्येकी अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदावरून युती तुटली आणि महाविकास आघाडी स्थापन झाली. त्यामुळे सर्वाधिक आमदार असूनही भाजपला सत्तेबाहेर बसावे लागले. भाजप शांत बसणार नव्हताच.

महाविकास आघाडीला 23 जागा

परिणामी, आधी शिवसेना फुटली, त्याच्या वर्षभरानंतर राष्ट्रवादी काँग्रेस फुटली. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवार (Sharad Pawar) यांना सहानुभूती मिळाली. ती आतापर्यंत टिकून राहिली. असे टीव्ही 9 पोलस्ट्रॅटच्या एक्झिट पोलवरून दिसून येत आहे. या एजन्सीने शिवसेना ठाकरे गटाला 9, काँग्रेसला 8 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला 6 जागा अशा महाविकास आघाडीला एकूण 23 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला आहे.

लोकसभेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीला राज्यातील सर्व 48 जागांवर उमेदवार मिळतील की नाही, अशी शंका निर्माण झाली होती, कारण एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांच्यासोबत त्यांच्या पक्षातील प्रत्येकी 40 आमदार, बहुसंख्य खासदार बाहेर पडले होते. त्यामुळे भाजपने मिशन 45 ची मोहीम आखली आणि त्याचा मोठा गाजावाजा केला होता. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या नियोजनाचा महायुतीला अंदाज आला नसेल का, अशीही शंका निर्माण होते.

अंदाज आला असली तरी संख्याबळ सोबत असल्याने महायुतीने त्याकडे दुर्लक्ष केले असावे. निवडणूक जाहीर झाली आणि उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसचे नेते सक्रिय झाले. त्यांनी महायुतीला तोडीस तोड उमेदवार दिले. त्यामुळे महायुतीला संघर्ष करावा लागला. निवडणूक त्यांच्यासाठी सोपी राहिली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात ठाण मांडावे लागले.

Sharad Pawar, Uddhav Thackeray
Exit Poll Lok Sabha Election 2024 : माढ्यात मोहिते पाटील आघाडीवर; भाजपचे निंबाळकर पिछाडीवर

उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना लोकांमध्ये सहानुभूती आहे, याची कल्पना महायुतीच्या नेत्यांना होती. ही सहानुभूती टिकू नये, यासाठी महायुतीच्या नेत्यांना आटोकाट प्रयत्न केले. त्यातून ठाकरे, पवार यांच्यावर टोकाची टीका केली जाऊ लागली. त्याचा परिणाम उलटा होत गेला. त्यांच्याप्रति सहानुभूती वाढत राहिली.

महाराष्ट्र फुटिरांना सहन करत नाही...

महायुतीच्या तुलनेत महाविकास आघाडीकडे यंत्रणा कमी असतानाही त्यांना लोकांमधून चांगला प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले. त्याचेच प्रतिबिंब एक्झिट पोलच्या अंदाजांमध्ये दिसून येत आहे. एक्झिट पोल हे अंदाज असतात, ते खरेच ठरतील असे म्हणता येणार नाही. या अंदाजात भाजपच्या मिशनला धक्का बसताना दिसत आहे. खरेच तसे झाले तर महाराष्ट्र फुटिरांना सहन करत नाही, असे सिद्ध होईल.

Sharad Pawar, Uddhav Thackeray
Lok Sabha Election 2024 Exit Polls : दिल्लीचे तख्त मोदी राखणार; काँग्रेसचे दावे फोल ठरण्याचे अंदाज...

शरद पवार हे सध्या वयाच्या 84 व्या वर्षात आहेत. या वयातही त्यांचा उत्साह, कामाचा उरक हा तरुणांना लाजवेल असाच आहे. त्यांच्या सभांना ज्येष्ठांसह तरुणांचीही गर्दी व्हायची. 2019 च्या निवडणुकीपूर्वीही शरद पवार यांचे अनेक शिलेदार त्यांना सोडून गेले होते. त्यावेळी त्यांनी पक्षाला सावरून 50 पेक्षा अधिक आमदार निवडून आणले होते.

2024 च्या निवडणुकीतही त्यांनी तसाच उत्साह दाखवला आहे. आपण उभा केलेला पक्ष आपणच मोठे केलेले सहकारी हिरावून घेतात, या धक्क्यातून शरद पवार यांच्या जागी आणखी एखादा अन्य नेता असता तर तो सावरला असता का, याबाबत शंकाच आहे. या वयातही ते त्वेषाने लढले आणि त्याचा परिणाम आता दिसून येऊ लागला आहे.

उद्धव ठाकरे यांच्याही वाट्याला असाच प्रसंग आला. मुख्यमंत्री असताना ते आजारी होते, त्यावेळीच त्यांचा पक्ष फुटला. शिवसेनेने अनेक सामान्य लोकांना मंत्री, आमदार, खासदार केले. असेच लोक ठाकरे यांना सो़डून गेले. त्यांच्यावर सातत्याने विविध प्रकारचे आरोप करण्यात आले. त्यांच्यावर वैयक्तिक टीकाही करण्यात आली. गेल्या पाच वर्षांतील राजकीय घडामोडींत महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकमेकांवर केलेल्या आरोप-प्रत्यारोपांचे प्रमाण सर्वाधिक असेल.

सर्व शिलेदार सोडून गेलेले असताना ठाकरे यांनीही निष्ठावंतांना सोबत घेऊन किल्ला लढवला. ठाकरे, पवार यांना महाविकास आघाडीतील काँग्रेसकडूनही चांगली साथ मिळाली. एक्झिट पोलचे अंदाज खरे ठरले तर महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचीच चलती आहे, हे सिद्ध होईल. त्यासाठी प्रत्यक्ष निकालाची म्हणजे चार जूनची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Sharad Pawar, Uddhav Thackeray
Udayanraje Vs Shashikant Shinde : साताऱ्यात उदयनराजे नव्हे; शशिकांत शिंदे उडवणार काॅलर?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com