Girish Mahajan & Gulabrao Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

MLC Election 2026 : शिंदेंच्या मंत्र्याचे मुलाला आमदार करण्याचे स्वप्न हवेतच विरणार; गिरीश महाजनांनी विधान परिषदेसाठी लावली मोठी फिल्डिंग...

BJP vs Shinde Sena Battle : राज्यातील 17 विधान परिषद मतदार संघातील निवडणुकीसाठी उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. महायुतीकडे भक्कम मतदार संख्याबळ असल्याने ते निश्चिंत आहेत. विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यासाठी डावपेच आखले आहेत.

Sampat Devgire

Nashik News, 24 May : विधान परिषद निवडणुकीच्या बारा जागांवर निवडणुकीसाठी भाजप ठाम आहे. यासंदर्भात सात मंत्र्यांची सुकाणू समिती काम करीत आहे. महायुतीतील घटक पक्षांना चुचकारून शांत करण्यासाठी ही समिती कोणते 'मेलडी' चॉकलेट पुढे करते हा उत्सुकतेचा विषय आहे.

राज्यातील 17 विधान परिषद मतदार संघातील निवडणुकीसाठी उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. महायुतीकडे भक्कम मतदार संख्याबळ असल्याने ते निश्चिंत आहेत. विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यासाठी डावपेच आखले आहेत.

नाशिक आणि जळगाव या दोन्ही मतदारसंघावर भाजपचा भक्कम दावा आहे. मंत्री गिरीश महाजन त्यासाठी नियोजन करीत आहेत. एकनाथ शिंदेंचा शिवसेना पक्ष या दोन्ही जागांसाठी आग्रही असला तरी त्यांचा दावा कितपत टिकेल हा उत्सुकतेचा विषय आहे.

जळगाव मतदारसंघात मंत्री गुलाबराव पाटील सर्व शक्तीनिशी कामाला लागले आहेत. यानिमित्ताने घरात दुसरी आमदारकी आणण्यासाठी त्यांनी देव पाण्यात बुडवून ठेवले आहेत. मुलाचे राजकीय पुनर्वसन करण्यासाठी ते सर्व प्रतिष्ठा पणाला लावणार आहेत.

भाजप नेते गिरीश महाजन यांनी मात्र पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना शब्द दिला आहे. केवळ उमेदवारी अर्ज दाखल करणे एवढीच भाजपच्या उमेदवारासाठी औपचारिकता आहे. मंत्री महाजन यांच्या विश्वासातील नेत्याला उमेदवारी मिळणार हे जवळपास निश्चित आहे.

भाजपच्या सुकाणू समितीत सात मंत्र्यांचा समावेश आहे. त्यामध्ये गिरीश महाजन प्रमुख सदस्य आहे. या समितीची बैठक उद्या होणार आहे. यावेळी नाशिक आणि जळगावच्या उमेदवारीचा निर्णय होईल. त्याची घोषणा मात्र शेवटच्या क्षणी होऊ शकेल.

मंत्री महाजन जळगाव मतदार संघासाठी गुलाबराव पाटील यांना काय आश्वासन देतात हे अद्याप गुलदस्त्यात आहे. भाजपचे हेच धोरण नाशिक मतदार संघासाठी देखील आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोन्ही मतदारसंघाची जबाबदारी मंत्री महाजन यांच्यावर सोपविली आहे.

महाजन यांनी नाशिक आणि जळगाव दोन्ही मतदारसंघ आपल्याकडे ठेवण्यासाठी पूर्ण निश्चय केला आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नाशिक आणि जळगाव मतदार संघासाठी जागा आपल्याकडे ठेवण्यात कितपत यश येईल हा उत्सुकतेचा विषय आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT