Photo Caption: Senior Mahayuti leaders discuss Maharashtra Legislative Council seat-sharing as BJP remains firm on retaining the prestigious Nashik and Jalgaon constituencies. Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik MLC : शिवसेनेचा दावा ठरला फुसका बार! नाशिक, जळगाव भाजपकडेच? बंडखोरी रोखण्यासाठी नगरसेवकांना 'शिस्तीचा' डोस!

MLC Elections Nashik Jalgaon Seats : महायुतीच्या विधान परिषद मतदारसंघाच्या जागा वाटपाबाबत तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी ठाम भूमिका घेतली आहे. त्याबाबतचे संकेत थेट दिल्लीतून देण्यात आले. त्यामुळे तडजोडीला फारसा वाव नाही. त्यामुळेच अधिकृत घोषणा सातत्याने लांबणीवर पडत आली आहे.

Sampat Devgire

Nashik News, 31 May : विधान परिषद निवडणुकीतील 17 जागावाटपांचा निर्णय आज दुपारी जाहीर होणार आहे. यामध्ये प्रतिष्ठेच्या जळगाव आणि नाशिक या दोन्ही जागा भाजपने आपल्याकडेच ठेवल्या आहेत. त्यात कोणताही बदल होणार नाही, असे संकेत देण्यात आलेत.

महायुतीच्या विधान परिषद मतदारसंघाच्या जागा वाटपाबाबत तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी ठाम भूमिका घेतली आहे. त्याबाबतचे संकेत थेट दिल्लीतून देण्यात आले. त्यामुळे तडजोडीला फारसा वाव नाही. त्यामुळेच अधिकृत घोषणा सातत्याने लांबणीवर पडत आली आहे.

महायुतीच्या दृष्टीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकाऱ्यांनी जळगाव आणि नाशिक यापैकी एक जागा मिळावी यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. विशेषतः मंत्री गुलाबराव पाटील यांना आपल्या चिरंजीवांसाठी जळगावची जागा हवी आहे. त्या बदल्यात नाशिकची जागा प्रभावी नेतृत्व नसल्याने सोडण्याची त्यांची तयारी असल्याचे कळते.

मात्र त्यात कितपत यश येते, हा वादाचा विषय आहे. जळगावची जागा भाजपचीच होती. नाशिकची जागा शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडे होती. माजी आमदार नरेंद्र दराडे यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केला होता. त्यामुळे या जागेवर शिवसेनेने दावा केला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत दोन्ही जागांचे निर्णय गिरीश महाजन यांच्यावर सोपविला होत आहे. आज दुपारी या संदर्भात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची चर्चा होऊन घोषणा होऊ शकते. त्यात भाजपने नाशिक आणि जळगाव आपल्याकडेच ठेवण्यासाठी प्रतिष्ठेचा मुद्दा केला आहे.

शनिवारी सायंकाळी या संदर्भात जागावाटप झाल्याची अनधिकृत माहिती बाहेर आली होती. त्यात जळगावची जागा भाजपला तर नाशिकची जागा शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाला जाईल असे म्हटले होते. त्यामुळे मंत्री गुलाबराव पाटील यांनी तातडीने मुंबईला प्रयाण केले होते. मात्र याबाबतचा निर्णय थेट मुख्यमंत्री घेणार असल्याने अन्य नेत्यांना त्यात हस्तक्षेपाचा फारसा भाव नाही.

आज दुपारी याबाबतची घोषणा होईल, असे सूत्रांनी सांगितले. उमेदवारीचा निर्णय देखील याआधीच निश्चित करण्यात आला आहे. मंत्री गिरीश महाजन भाजपचे दोन्ही उमेदवार कोण? हे आज सायंकाळी निश्चित करतील. त्यानंतर उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने भाजपचे उमेदवार आपला अर्ज दाखल करणार आहे. त्यानंतर शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात ऐनवेळी काय निर्णय होतो? त्यावर मोठ्या राजकीय घडामोडी अवलंबून आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT