Pune Toxic Liquor Case : पुणे हादरवणाऱ्या विषारी दारूकांडामागे भिवंडी कनेक्शन? 5,929 लिटर मिथेनॉल जप्त

FDA seizes 5,929 liters methanol from Bhiwandi warehouse linked Pune toxic liquor tragedy that claimed 23 lives : पुणे विषारी दारू प्रकरणातील रासायनिक पुरवठ्याचा माग काढताना एफडीएला भिवंडीतील एका गोदामाचा धागा लागला होता.
Pune Toxic Liquor Case
Pune Toxic Liquor CaseSarkarnama
Published on
Updated on

Bhiwandi FDA Raid : पुण्यात विषारी दारूमुळे 23 जणांचा मृत्यू झाल्यानंतर राज्यभरातील यंत्रणा अलर्ट मोडवर आल्या आहेत. या प्रकरणाच्या तपासात मोठी प्रगती करत अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) भिवंडीतील एका गोदामावर धाड टाकून तब्बल 5,929 लिटर मिथेनॉलचा बेकायदा साठा जप्त केला आहे.

प्राथमिक तपासात पुण्यात तयार करण्यात आलेल्या विषारी दारूमध्ये याच मिथेनॉलचा वापर झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पुणे (Pune) विषारी दारू प्रकरणातील रासायनिक पुरवठ्याचा माग काढताना एफडीएला भिवंडीतील एका गोदामाचा धागा लागला होता. त्यानुसार आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार विशेष पथकाने शुक्रवारी रात्री भिवंडी तालुक्यातील वळ ग्रामपंचायत हद्दीतील म्हात्रे कम्पाउंड परिसरातील 'रेक्स इंटरनॅशनल' या कंपनीच्या गोदामावर छापा टाकला.

औषध निरीक्षक योगेंद्र पोळ यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कारवाईत अत्यंत घातक मानल्या जाणाऱ्या मिथेनॉल या विषारी रसायनाचा 5,929 किलोग्रॅम साठा जप्त करण्यात आला. कारवाईनंतर संपूर्ण गोदाम सीलबंद करण्यात आले.

Pune Toxic Liquor Case
Toxic Liquor Tragedy in Pune: मध्यरात्री एका झटक्यात तब्बल 21 अधिकारी निलंबित; CM फडणवीसांच्या आदेशानंतर मोठी कारवाई

विषारीद्रव्य कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी कंपनीचे मालक अरुणकुमार चौबे आणि अभिषेक चौबे यांच्याविरोधात नारपोली पोलिस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय कंपनीचा परवाना रद्द करण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने या दोघांना आधीच ताब्यात घेतले असल्याची माहिती समोर आली आहे.

Pune Toxic Liquor Case
Diesel Smuggling : गडचिरोलीतील खाणकामासाठी डिझेलचा काळा धंदा; मुंबईतून निघालेला 34 हजार लिटरच्या टँकरसह 55 लाखांचा मुद्देमाल जप्त

तपासादरम्यान पुण्यात विकल्या गेलेल्या भेसळयुक्त दारूसाठी आवश्यक असलेले मिथेनॉल याच कंपनीकडून पुरवण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. विशेष म्हणजे, या विषारी रसायनाच्या खरेदी-विक्रीची कोणतीही अधिकृत नोंद किंवा साठ्याची माहिती कंपनीच्या नोंदवहीत आढळून आली नाही.

तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, आरोपी कर्नालसिंग विरका, मुख्य सूत्रधार योगेश वानखेडे आणि उरळी कांचन येथील राजू प्रजापती यांच्या माध्यमातून हे रसायन पुण्यात पोहोचवण्यात आले होते.

1745 कोटींचे कोकेन जप्त

भिवंडी परिसरातील गोदामांमध्ये रासायनिक पदार्थ आणि अमली पदार्थांचा अवैध साठा होत असल्याच्या तक्रारी यापूर्वीही समोर आल्या आहेत. अवघ्या महिनाभरापूर्वी राहनाळ ग्रामपंचायत हद्दीतील एका गोदामावर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने धाड टाकून तब्बल 349 किलो उच्च प्रतीचे कोकेन जप्त केले होते. या कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सुमारे 1745 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले होते.

आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना सोडणार नाही

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या कारवाईनंतर कठोर इशारा दिला आहे. जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांची कोणतीही गय केली जाणार नाही. अवैध औषधे, रसायने आणि बेकायदेशीर व्यवहारांविरोधातील कारवाई आणखी तीव्र करण्यात येणार असून, कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर थेट न्यायालयीन कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com