MNS party Raj Thackeray Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

MNS candidates missing : मतदानाआधीच राजकीय भूकंप! ऐन महापालिकेच्या रणधुमाळीत मनसेच्या दोन उमेदवारांचे अपहरण? निवडणुकीत नवा ट्विस्ट

Maharashtra municipal elections : राज्यात महापालिका निवडणुकीचं बिगूल वाजलं असून प्रचाराचा नारळ फुटला आहे. अशा या रणधुमाळीत अहिल्यानगरमधून मोठी बातमी समोर आली आहे.

Aslam Shanedivan

  • महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे.

  • मनसेने काही उमेदवारांचे अर्ज अवैध ठरवल्याचा आरोप केला आहे.

  • अहिल्यानगरमध्ये मनसेचे दोन उमेदवार अचानक बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे.

Ahilyanagar News : राज्यात महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरूवात झाली असून भाजपसह एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं मतदानाच्या आधीच खाते उघडले आहे. तर विविध पक्षांकडून आता प्रचाराला सुरूवात होणार आहे. अशातच राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नव निर्माण सेनेच्या उमेदवारांचे अर्ज बाद केले जात असल्याचा आरोप मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केला असून त्यांनी नुकताच ठाणे महापालिकेवर धडक देत वरिष्ठ अधिकाऱ्यांना जाब विचारला आहे. या घटनेमुळे राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चांना वेग आला असतानाच अहिल्यानगरमधून मोठी आणि खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. येथील महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले मनसेचे दोन उमेदवार अचानक गायब झाले आहेत, त्यांच्या अपहरणाचा संशय व्यक्त केला जात आहे.

एकीकडे राज्यभर महापालिका निवडणुकीचा उत्साह शिगेला पोहचला असून उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. भाजपसह एकनाथ शिंदेंची शिवसेना बंडखोरांना शांत करण्यात लागली असून पुढच्या दोन दिवसात बंडखोर अर्ज मागे घेण्याची शक्यता आहे. अशातच भाजपचे विजया षटकार तर शिदेंच्या शिवसेनेने चौकार मारला आहे.

दरम्यान ठाणे महापालिकेत मनसेचे अर्ज बाद केल्यावरून संताप व्यक्त केला जात आहे. येथील वागळे प्रभागात शिवसेना शिंदे गटाच्या राज्य सचिवाच्या पत्नीला बिनविरोध निवडून देण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी षडयंत्र रचत मनसेसह विरोधकांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरवले, असा गंभीर आरोप मनसेने केला आहे. यावरून सध्या वातावरण तापले आहे.

अहिल्यानगर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले मनसेचे दोन उमेदवार अचानक गायब झाल्याची बातमी राज्यभर पसरली आहे. गेल्या चोवीस तासांपासून हे दोन्ही उमेदवार गायब असून त्यांचा कुटुंबाशी कोणताही संपर्क झालेला नाही. यामुले यांच्या अपहरणाचा संशय व्यक्त केला जात असून मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ आणि सुमित वर्मा यांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे.

याबाबत विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांनी, केडगाव भाग हा संवेदनशील असल्याने निवडणूक बिनविरोध होण्यासाठीच दोन उमेदवारांचे अपहरण केले असल्याचा संशय व्यक्त केला आहे. तर प्रभाग क्रमांक सतरा मधील राहुल जाधव आणि अंबरनाथ भालसिंग असे गायब झालेल्या उमेदवारांची नाव असल्याची त्यांनी माहिती दिली आहे.

तर या दोन्ही उमेदवार उमेदवारांपैकी एक उमेदवार हा भारतीय जनता पार्टी तर दुसरा उमेदवार राष्ट्रवादी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या विरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. पण आता ऐन प्रचाराच्या दरम्यान हे दोन्ही अचानक गायब झाल्याने मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. तसेच या प्रकरणात तक्रार दिली असून उमेदवारांचा तपास लवकर व्हावा, अशी मागणी केली आहे.

FAQs :

1. महापालिका निवडणुकीचे मतदान कधी होणार आहे?
👉 15 जानेवारी रोजी मतदान आणि 16 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे.

2. मनसेने कोणते आरोप केले आहेत?
👉 मनसेने काही उमेदवारांचे अर्ज जाणीवपूर्वक अवैध ठरवल्याचा आरोप केला आहे.

3. कोणते उमेदवार बेपत्ता झाले आहेत?
👉 अहिल्यानगर महापालिकेतील मनसेचे दोन उमेदवार बेपत्ता झाल्याची माहिती आहे.

4. अपहरणाचा संशय का व्यक्त केला जात आहे?
👉 उमेदवार अचानक संपर्काबाहेर गेल्याने अपहरणाचा संशय व्यक्त केला जात आहे.

5. प्रशासनाकडून काय कारवाई अपेक्षित आहे?
👉 या प्रकरणाची तातडीने चौकशी करून सत्य समोर आणण्याची मागणी होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT