Dada bhuse Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Politics : गिरीश महाजनांचा दादा भुसे यांना डबल झटका; शिंदेंच्या आणखी एका मंत्र्याचे घरातच अस्तित्वच धोक्यात!

Dada Bhuse Political Crisis : नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावरच दादा भुसे यांना हायव्होल्टेज शॉक बसला आहे. गेले काही दिवस भाजपच्या संपर्कात असलेल्या अद्वय हिरे यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. त्यामुळे दादा भुसेंच्या खेळीला त्यांनी जबर उत्तर दिले.

Sampat Devgire

Nashik News, 20 Nov : गेले काही दिवस मंत्री दादा भुसे यांनी सत्तेच्या माध्यमातून आपल्या विरोधकांना नामोहरम केले होते. त्यांचा हा ससेमीरा थांबतच नव्हता. त्याला आता जबर उत्तर मिळाले आहे. शिवसेना एकनाथ शिंदेंचे निकटवर्तीय दादा भुसे यांची आपल्या मतदारसंघातच राजकीय कोंडी झाली आहे.

विरोधकांचे राजकीय अस्तित्व संपवण्याच्या नादात ते स्वतःच टप्प्यात आले. आता त्यांची परफेक्ट शिकार झाली आहे. मंत्री दादा भुसे यांचा वारू सुसाट निघाला होता. त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते अद्वय हिरे यांच्याविरुद्ध त्यांनी खेळी केली. त्यामुळे खटल्यांचा ससेमिरा हिरे यांच्या मागे लागला. यात हिरे मेटाकुटीला आले होते.

नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावरच दादा भुसे यांना हायव्होल्टेज शॉक बसला आहे. गेले काही दिवस भाजपच्या संपर्कात असलेल्या अद्वय हिरे यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. त्यामुळे दादा भुसेंच्या खेळीला त्यांनी जबर उत्तर दिले.

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी विधानसभा निवडणुकीत भुसे यांच्या विरोधात बंडू काका बच्छाव यांना बळ दिले होते. बंडूकाका बच्छाव यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते घेत भुसे यांना निवडणुकीत दमवले होते. आता महाजन यांनी उघड खेळी करत बच्छाव यांनाही भाजप पक्षात प्रवेश दिला.

यानिमित्ताने दादा भुसे यांना नाशिक महापालिका आणि नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री महाजन यांनी धक्का दिला. एकनाथ शिंदे पक्ष स्वबळावर निवडणुकीचे हाकारे पिटत होता. त्या दृष्टीने दादा भुसे यांची कोंडी करण्यात महाजन यशस्वी झाले.

मालेगाव मतदारसंघात विरोधकच सत्ताधारी बनले आहे. त्यामुळे दादा भुसे यांनी विरोधकांना हैराण करण्याचे सत्र सुरू केले होते. त्याला मोठा ब्रेक लागणार आहे. या निमित्ताने दादा भुसे यांची मालेगाव बाह्य या मतदार संघात कोंडी निश्चित आहे. त्यांचे दोन्ही विरोधक भाजप पक्षात गेले आहेत. त्यामुळे भुसे यांना मोठे आव्हान मिळाले आहे.

त्यात त्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. जलसंपदा मंत्री महाजन यांनी टाकलेला हा डाव भुसे यांची दुहेरी कोंडी करणार आहे. असे यांचे परंपरागत विरोधक अद्वय हिरे यांच्या मागे लागलेला खटल्यांचा ससेमिरा त्याला कारणीभूत आहे. एकेकाळचे सहकारी बच्छाव यांना भुसे यांची सर्व गुपिते माहीत आहेत. त्यामुळे आगामी काळात महायुतीचे दोन्ही घटक पक्ष एकमेकांशी खडाखडी करताना दिसतील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT