Maharashtra Police News  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Maharashtra Police : धक्कादायक : पोलीस पथकावर काळाचा घाला ; दोघांचा मृत्यू ; गुन्ह्याच्या तपासासाठी निघालेल्या..

सरकारनामा ब्युरो़

Jalgaon News : गुन्ह्याच्या प्रकरणाची चौकशीसाठी निघालेल्या एका पोलीस निरीक्षकाचा अपघातात मृत्यू झाला. या अपघातात त्यांच्या वाहनचालकाचाही मृत्यू झाला. (police officer and driver killed a tree fell on the police car in erandol jalgaon)

या दोघांच्या मृत्यूमुळे पोलिसदलात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. जळगाव जिल्ह्यातील एरंडोल-कासोदाकडे रस्त्यावर गुरुवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

पोलीस निरीक्षक सुदर्शन दातीर आणि वाहन चालक अजय चौधरी असे अपघातातील मृतांची नावे आहेत तर तीन जण गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या गाडीवर झाड कोसळल्याने या दोघांचा मृत्यू झाला. या पथकाच्या वाहनावर अंजनी धरणाजवळ झाड कोसळलं होतं.

या पथकातील चंद्रकांत शिंदे, नीलेश सूर्यवंशी, भरत जेठवे हे तीन कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना एरंडोल ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

आर्थिक गुन्हे शाखेचे हे पथक चाळीसगाव तालुक्यातील पिलखोड येथील एका प्रकरणी तपासासाठी जात होते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

सुदर्शन दातीर हे अंबड येथील रहिवासी असून त्यांच्या मृत्यूची माहिती मिळताच गावावर शोककळा पसरली. रात्री अनेक गावकरी वाहनाने जळगावकडे रवाना झाले. दातीर यांच्या मागे आई, वडील, भाऊ, पत्नी व एक लहान मुलगा असा परिवार आहे. एक शेतकऱ्याचा मुलगा ते पोलीस अधिकारी अशी ओळख असलेल्या दातीर यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.

या घटनेची माहिती मिळताच कासोदा पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे या तातडीने घटनास्थळी पोहोचल्या. स्थानिकांच्या मदतीने जखमी पोलिसांना बाहेर काढण्यात आले.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT