Ayushman Bharat Yojana: पुणे तिथं 'उणेच'; मोदींच्या महत्वाकांक्षी योजनेला वाटाण्याच्या अक्षता

Ayushman Bharat Yojana News Update: लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यास पुण्यात आरोग्य प्रशासनाला अपयश आले.
Aayushyman Bharat yojana News Update
Aayushyman Bharat yojana News Update Sarkarnama
Published on
Updated on

Pune News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2018 मध्ये आयुष्यमान भारत म्हणजेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजना जाहीर केली. केंद्र सरकारद्वारे या योजनेत द्वितीय आणि तृतीय स्तरावरील रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेण्यासाठी 5 लाखांपर्यंत विमा संरक्षण देण्यात आलं आहे.

या योजनेद्वारे पात्र नागरिकांना सूचीबद्ध रुग्णालयात वैद्यकीय सुविधांचा लाभ घेता येतो. मात्र, आयुष्यमान भारत योजनेची माहिती बऱ्याच पुणेकरांना नसल्याचे आढळले आहे.

आयुष्यमान भारत योजना राबवण्यात पुणे जिल्हा सर्वात मागे असल्याचे एका आकडेवारीवरुन स्पष्ट झाले आहे. 'पुणे तिथं काय उणे'असे आता सावधपण म्हणावे लागेल, कारण आरोग्याबाबत, आयु्ष्यमान भारत योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यास जिल्हा आरोग्य प्रशासनाला अपयश आले आहे.

Aayushyman Bharat yojana News Update
Ramdas Athawale News: शिंदे-फडणवीसांकडे 'रिपाइं' केली ही मागणी; आगामी निवडणुकीत योग्य वाटा..

"पुढील सात दिवसात जिल्हाभरात आयुष्यमान भारत योजना यशस्वीरित्या राबवा," असा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्यविभागाला दिला आहे. पुढील सात दिवसात सर्व लाभार्थी कुटुंबांना आयुष्यमान योजनेचे कार्ड वाटा, असे आदेश जिल्हा परिषदेने दिले आहे. या आदेशामुळे त्यामुळे आरोग्य कर्मचारी कामाला लागले आहेत.

आयुष्मान योजनेअंतर्गत आत्तापर्यंत जिल्ह्यात केवळ ३२ टक्के कुटुंबांनाच कार्डचे वाटप करण्यात आले आहे. आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत जिल्ह्यात आहेत ५ लाखापेक्षा अधिक लाभार्थी, त्यापैकी आत्तापर्यंत केवळ १ लाख ७८ हजार जणांना आयुष्यमान कार्डचे वाटप झाले आहे.

Aayushyman Bharat yojana News Update
BMC Control Room News: 'त्या' एका कॉलमुळे मुंबई हादरली; BMC कंट्रोल रुमला फोन.., दोन दहशतवादी

आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही जगातील सर्वात मोठी योजना आहे. या योजनेद्वारे 10.74 कोटींहून अधिक गरीब आणि वंचित कुटुंबाना मोफत उपचार करणे हा उद्देश आहे. यामध्ये देशातील जवळपास 50 कोटी नागरिकांचा समोवश होतो.

काय आहे आयुष्यमान भारत योजना..

  • आयुष्यमान भारत योजनेत 30 हजारांपासून तीन लाखांपर्यतचे उपचार घेता येतात.

  • पाच लाखांपर्यंत विमा संरक्षण मिळतं. आयुष्यमान भारत ही योजना कागदपत्र विरहित योजना आहे.

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com