Parag Pashte Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Maharashtra Politics : काँग्रेस म्हणते, `राज्यातील एकनाथ शिंदे सरकार शेतकरीविरोधी`

Sampat Devgire

Congress Vs BJP Politics : आस्मानी आणि सुलतानी संकटांमुळे राज्यातील शेतकरी प्रचंड अडचणीत आहेत. त्यांच्या प्रश्नांवर राज्य सरकार केवळा घोषणांचा गडगडाट करीत आहेत. त्यांना सहाय्य व सहकार्य करण्याऐवजी राज्य शासन ढिम्म आहे. हे सरकार शेतकरीविरोधी असल्याने त्यांना उखडून फेकावे लागेल. (Eknath Shinde Government very careless about Farmers issue)

महाराष्ट्र किसान काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष पराग पाष्टे यांच्या उपस्थितीत नंदुरबार येथे कार्यक्रम झाला. यावेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अंतर्गत महाराष्ट्र किसान व शेतमजूर काँग्रेसतर्फे शेतकरी (Farmers) संवाद यात्रेचा प्रारंभ करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) केवळ भारतीय जनता पक्षाच्या (BJP) हिताचे राजकारण करतात, असा आरोप यावेळी करण्यात आला.

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना विमा रक्कम मिळावी, महाराष्ट्रातील सर्व जिल्हे तातडीने दुष्काळग्रस्त जाहीर करावेत. गेल्या वर्षीची थकीत व या वर्षातील नुकसानीची विमा रक्कम शेतकऱ्यांना तातडीने मिळावी. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात. शेतीसाठीचा वीजपुरवठा नियमित सुरू ठेवावा यांसह विविध विषयांवर चर्चा झाली.

यावेळी श्री. पाष्टे म्हणाले, की महाराष्ट्रातील शेतकरी आज प्रचंड अडचणीत आहे. निसर्गाच्या अवकृपेमुळे, अवकाळी पावसामुळे, तर काही ठिकाणी पडलेल्या भयानक दुष्काळामुळे शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. अशा भीषण अवस्थेत राज्य सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. राज्यातील हवालदिल शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी किसान काँग्रेसतर्फे नंदुरबार ते नागपूर अशी शेतकरी संवाद यात्रा आयोजित केलेली आहे.

किसान काँग्रेसचे देवाजी चौधरी, जिल्हा काँग्रेसचे कमिटीचे कार्याध्यक्ष सुभाष पाटील, उत्तमराव देसले, अशोक पाटील, राज्य उपाध्यक्ष विश्वंभर बाबर, जगन्नाथ पवार, पंडितराव पवार, राम कुराडे, वाजिद शेख, राजेंद्र पाटील, जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्की पाटील यांच्यासह जिल्ह्यातील काँग्रेसचे व किसान काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT