Shivsena Politics : शिवसेनेची आघाडी; नोंदवले तीस हजार शिक्षक मतदार?

There are 50 K voters registration in Nashik Teachers Constituency-शिक्षक मतदारसंघाची निवडणूकीत महाविकास आघाडी देणार उमेदवार, शुभांगी पाटील यांची तयारी जोरात
Shubhangi Patil & Kishore Darade
Shubhangi Patil & Kishore DaradeSarkarnama
Published on
Updated on

Nashik Teachers Constituency : विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या विविध नेत्यांनी नोंदणीवर लक्ष्य केंद्रीत केले आहे. शिवसेनेच्या उपनेत्या शुभांगी पाटील यांनी याबाबत पक्षाच्या कार्यकर्ते व अनुयायांनी मोठी आघाडी घेतल्याचा दावा केला आहे. (Shivsena`s Shubhangi Patil is probable Candidate for Nashik Teachers Constituency)

शिवसेनेच्या (Shivsena) उपनेत्या शुभांगी पाटील यांनी पक्षाच्या समर्थकांनी सुमारे तीस हजार मतदारांची नोंदणी केल्याचा दावा केला आहे. काँग्रेसचे (Congress) संदीप गुळवे यांनीही आपल्या संस्थेतर्फे नोंदणी केल्याने सध्या तरी या मतदारसंघात शिक्षकांच्या संघटना आणि महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) नोंदणीमध्ये आघाडी घेतली आहे.

Shubhangi Patil & Kishore Darade
Rajasthan Election: राजस्थानमध्ये बंडखोरांनी वाढवली डोकेदुखी; काँग्रेस, भाजपचे 737 बंडोबा उतरले रिंगणात

नाशिक विभागाच्या या मतदारसंघात येवल्याचे किशोर दराडे आमदार आहेत. ते शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाचे मानले जातात. त्यांनी प्रत्येक तालुक्यात नोंदणीसाठी प्रतिनिधी पाठवल्याचा दावा केला आहे. विविध शाळांना सगणक, झेरॉक्स, प्रींटरचे वाटप त्यांनी केले आहे.

या मतदारसंघात कार्यकर्त्यांमार्फत मतदार नोंदणी होत नसल्याने संस्थेमार्फतच शिक्षकांची नोंदणी करावी लागते. त्यामुळे विविध संस्थांच्या कर्मचाऱ्यांनी याबाबत पाठपुरावाव केला आहे. त्यात शिवसेनेच्या उपनेत्या शुभांगी पाटील प्रबळ दावेदार मानल्या जातात. त्यांनी विभागातील पाचही जिल्ह्यात नोंदणीसाठी पाठपुरावा केला आहे. सध्या नाशिक- १७,१९२, धुळे- ७,००९, जळगाव- ९,६८०, नंदुरबार- ३,३७८ आणि नगर- ९,४१७ असे ४६,६२६ मतदारांची नोंदणी झाली आहे. ही संख्या सुमारे पन्नास हजार असून येत्या ९ डिसेंबरपर्यंत ती पंचावन्न हजार होऊ शकेल असा अंदाज आहे. गतवर्षीच्या तुलनेत त्यात दहा ते पंधरा टक्के वाढ अपेक्षित आहे.

या मतदारसंघात शिवसेनेच्या उपनेत्या शुभांगी पाटील, विद्यमान आमदार दराडे, काँग्रेसचे संदीप गुळवे हे प्रमुख उमेदवार नोंदणीत सक्रीय आहेत. याशिवाय धुळे व नगर जिल्ह्यातील काही नेते प्रयत्नशील असून शिक्षण संस्थांचा पाठींबा या निवडणुकीसाठी महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे शिक्षक मतदारसंघाची निवडणूक देखील यंदा चुरशीची ठरण्याची शक्यता आहे.

Shubhangi Patil & Kishore Darade
Maharashtra Politics : बारामतीचा प्रश्न विचारताच छगन भुजबळांनी गप्प राहणेच पसंत केले!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com