Nagar : लोकसभा निवडणुकीसाठी शड्डू ठोकून असलेले आमदार निलेश लंके यांच्याकडून विखे पिता-पुत्रांवर सुरू असलेला टीकेचा भडिमार थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. वास्तविक महायुतीत सहभागी असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटात लंके असले तरी आपल्या भाषणांतून ते आपण लोकसभेसाठी उमेदवारी कायम ठेवून असून त्यादृष्टीने वक्तव्ये त्यांची सुरू आहेत.
नुकत्याच झालेल्या एका भाषणात लंके यांनी, विखेंकडून आपण मंजूर करून आणलेल्या कामांचे श्रेय घेण्याचा कसा प्रयत्न होत आहे हे सांगतानाच, "तुम्ही मंजुर केले आहे ना, तुम्ही नारळ फोडा, मी काम मंजुर केलंय तर मीच नारळ फोडणार, दुसऱ्याच्या झेंड्यावर मी पंढरपूरची स्वप्ने पाहत नाही" असे नाव न घेता टीकास्त्र सोडले.
नगर तालुक्यातील शिंगवे नाईक व नांदगांव येथील विविध विकास कामांचा प्रारंभ लंके यांच्या हस्ते करण्यात आला. "आता त्यांना असे वाटू लागले आहे की राज्यच आपण चालवतोय की काय? प्रशासनास धाक दाखवायचा. प्रशासनाचे लोक बळच दडपशाही करून उभे करायचे, आणि सांगायचे की सांगा लोकांना आमची कामगिरी. तुमचे काम आहे ना, तुम्ही मंजुर केले आहे ना, तुम्ही नारळ फोडा, आम्ही येणारही नाही,"
नीलेश लंके कधी दुसऱ्याच्या झेंडयावर पंढरपूरची स्वप्ने पाहत नाही. मी काम मंजुर केलंय तर मीच नारळ फोडणार. तुम्ही मंजुर केले तर तुम्ही फोडा, असे सांगत आमदार लंके यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे व खासदार डॉ. सुजय विखे यांचे नाव न घेता टोला लगावला.
या कार्यक्रमास महाविकास आघाडीचे अनेक नेते उपस्थित होते. यात ठाकरे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष शशिकांत गाडे यांच्यासह जिल्हापरिषदेतील अनेक माजी सदस्य होते. त्यांच्या नावांचा संदर्भ घेत, माझं जाहीर आव्हान आहे. तुम्ही तुमच्या साडेचार वर्षातील कामाचा लेखाजोखा समोरासमोर घेऊन बसा, मी माझ्या कामाचा लेखाजोखा घेऊन समोरासमोर बसतो. जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय मंजुऱ्या घेउन जायच्या आणि सांगायचे हे काम तुझ्या गावचं, जिल्हा परिषदेचा आणि तुमचा काय संबंध? जिल्हा परिषदेशी प्रताप पाटलांचा, बाळासाहेब हराळांचा, संदेश कार्ले, मोकाटे यांचा संबंध आहे. तुमचा काडीचाही सबंध नाही तरीही सांगायचे आम्ही काम केले असे सांगत आ.लंके यांनी विखे पिता-पुत्रांवर नाव न घेता हल्ला चढवला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.