Sarkarnama Shiv Sena MLA Kishor Patil addresses concerns over Smart Meter installations in Maharashtra
उत्तर महाराष्ट्र

Kishor Patil : शिंदेंच्या आमदाराचा 'स्मार्ट मीटर'ला कडाडून विरोध; CM फडणवीसांनी विधानसभेत केलेल्या दाव्याची काढली हवा!

Kishor Patil on MSEDCL Smart Meter : आमदार पाटील यांनी स्मार्ट मीटरचा पंचनामाचा केला. एका ग्राहकाला ९५ युनिट वापरल्यानंतर चौदाशे रुपये बिल येत होते. स्मार्ट मीटर बसविल्यानंतर ६५ युनिट वापर झाला. त्याचे बिल २४ हजार रुपये आले. त्यातही १४ हजार रुपये दंडाचा समावेश, असल्याचं त्यांनी सांगितलं.

Sampat Devgire

Jalgaon News, 14 Jul : राज्यभरात महावितरण कंपनी स्मार्ट मीटर बसवीत आहे. त्याला वीज ग्राहकांचा तीव्र विरोध आहे. या विरोधाला आता राजकीय किनार लाभली आहे. महाराष्ट्रात स्मार्ट मीटर बसविण्याची मोहीम सुरू आहे. त्याला ठिकठिकाणी विरोध होत आहे.

त्याचे पडसाद विधिमंडळातही उमटले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा विरोध खोडून काढला. मात्र, आता जळगावमध्ये शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे आमदार किशोर पाटील यांनीच स्मार्ट मीटर विरोधात पुढाकार घेतला आहे. महायुतीचा घटक असलेल्या आमदार पाटील यांचा विरोध म्हणजे मुख्यमंत्र्यांना घरचा आहेर मानला जातो.

आमदार पाटील यांनी स्मार्ट मीटरचा पंचनामाचा केला. एका ग्राहकाला ९५ युनिट वापरल्यानंतर चौदाशे रुपये बिल येत होते. स्मार्ट मीटर बसविल्यानंतर ६५ युनिट वापर झाला. त्याचे बिल २४ हजार रुपये आले. त्यातही १४ हजार रुपये दंडाचा समावेश, असल्याचे आमदार पाटील म्हणाले.

स्मार्ट मीटरबाबत नागरिकांच्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी आहेत. त्यामुळे विरोध नाही हे राज्य शासनाचे म्हणणे योग्य नाही. कारण माझ्याकडे अनेक नागरिक सदोष बिले घेऊन येतात. ते लिखित तक्रार करीत नाहीत. या सगळ्यांना मी महावितरणकडे लिखित तक्रार करण्याचे आमदार पाटील यांनी सुचविले आहे.

कोणत्याही नागरिकाने मागणी केलेली नसताना स्मार्ट मीटर बसविले जाते. त्याविषयी नागरिकांच्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी आहेत. त्यामुळे मी स्वतःच राज्य शासनाला स्मार्ट मीटर बसवू नये अशी विनंती करणार असल्याचं म्हणत आमदार पाटील यांनी राज्य शासनाला घरचा आहेर दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT