Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackeray) corporators who arrived to cast their votes for the Legislative Council election. Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

MLC Election : नाशिक विधानपरिषदेसाठी 619 पैकी 618 जणांनी मतदान केलं, पण तो एक नगरसेवक मतदान का करु शकला नाही?

Nashik MLC Election : नाशिक विधानपरिषदेसाठी काल मतदान पार पडलं. जिल्ह्यात एकूण 619 मतदार आहेत त्यापैकी 618 जणांनी मतदान केलं. मालेगाव मधील एक नगरसेवक मात्र मतदान करु शकला नाही.

Ganesh Sonawane

Nashik MLC Election : नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी (दि.१८) झालेल्या मतदानात जिल्ह्यातील ६१९ पैकी ६१८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एका नगरसेवकाने मतदान केले नाही. एकुण ९९.८४ टक्के मतदानाची नोंद झाली. दरम्यान आता मतदानानंतर सर्वांचे लक्ष सोमवारी (दि. २२) रोजी होणाऱ्या मतमोजणी व निकालाकडे लागले आहे.

जे एक मतदान झाले नाही ते मालेगावातील असल्याची माहिती मिळाली आहे. मालेगाव महापालिकेच्या ८४ पैकी ८३ नगरसेवकांनी तहसील कार्यालयातील केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. मालेगावातील एमआयएमचे नगरसेवक आमदार मुफ्ती यांचे पुत्र (प्रभाग १३ क चे नगरसेवक) आफिज अब्दुला हे हज यात्रेसाठी सौदी अरेबियात असल्याने मतदान करू शकले नाही. ते मतदानापासून वंचित राहिले.

बंडखोरांचे बंड शमवण्यासाठी झालेल्या नाट्यामुळे नाशिक जिल्हापरिषदेची निवडणूक राज्यभर गाजली. अगदी मतदानाच्या दिवशीही नाशिकमध्ये हायहोल्टेज ड्रामा बघायला मिळाला. महायुतीकडून शिवसेनेचे नरेंद्र दराडे रिंगणात असताना अपक्ष गोकुळ गिते आणि प्रसाद हिरे यांचेही नाव मत पत्रिकेवर कायम राहिल्याने महायुतीला शेवटपर्यंत धाकधूक होती. त्यासाठी स्वत: मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये मतदानस्थळी तळ ठोकला होता. गिते बंधूंना पुन्हा मतदानाची दिवशी प्रेस घेऊन आपण या निवडणूकीतू माघार घेतल्याची भूमिका स्पष्ट करावी लागली.

जिल्ह्यातील नऊ मतदान केंद्रांवर सकाळी 8 वाजता मतदानास सुरुवात झाली. सुरुवातीच्या चार तासांत मतदान केंद्र जवळपास ओस पडली होती. दुपारी १२ वाजे पर्यंत केवळ ९.८१ टक्के मतदान झालं होतं. मात्र दुपारनंतर शहर व ग्रामीण भागातील मतदान केंद्रांवर मतदारांची उपस्थिती वाढली. मालेगावातील एका मतदार वगळता सर्वांचे मतदान झाले. जिल्ह्यात ३०० पुरुष व ३१९ महिला असे एकूण ६१९ मतदार आहेत. त्यांपैकी ६१८ जणांनी मतदान केलं.

अपक्ष उमेदवारांनी रिंगणातून माघार घेतली असली तरी संभाव्य दगाफटका टाळण्यासाठी महायुतीने आपल्या नगरसेवकांना चार दिवस शहराबाहेर ठेवले होते. ठाणे जिल्ह्यातील एका रिसॉर्टवर हे नगरसेवक मुक्कामी होती. गुरुवारी मतदानाच्या दिवशी या मतदारांना बसद्वारे थेट जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील मतदान केंद्रावर आणण्यात आले. त्यापूर्वी स्वत: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नाराज नगरसेवक मतदारांची समजूत काढावी लागल्याची चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT