Devidas Pingle & Baban Gholap Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik APMC News : देविदास पिंगळे, बबनराव घोलप एकत्र आल्याने विरोधक अस्वस्थ!

नाशिक बाजार समितीत महाविकास आघाडी झाल्याने खासदार हेमंत गोडसेंसह विरोधकांना झुंजवणार.

Sampat Devgire

नाशिक : नाशिक (Nashik) कृषी उत्पन्न बाजार समितीत (APMC) राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते देविदास पिंगळे (Devidas Pingle) यांचे वर्चस्व राहिले आहे. यंदा त्यांचे सर्व विरोधक एकत्र येऊ लागले होते. मात्र शिवसेना (Shivsena) ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे नेते, माजी बबनराव घोलप (Babanrao Gholap) आणि माजी खासदार पिंगळे यांनी महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) पॅनेलचे संकेत दिले आहेत. त्यामुळे विरोधकांना झुंजावे लागण्याची चिन्हे आहेत. (Mahavikas Aghadi panel will give strong fight for BJP, Shinde Group)

नाशिक बाजार समितीवर गेली अनेक वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदारदेविदास पिंगळे यांची एकहाती सत्ता राहिली आहे. राज्यात भाजपची सत्ता आल्यावर संकटमोचक गिरीष महाजन यांनी प्रयत्न केल्यावर देखील त्यांनी अनेक प्रकारे प्रयत्न करूनही त्यांना ही सत्ता घालविता आली नव्हती. त्यामुळे यंदा ही निवडणूक अतिशय रंजक ठरण्याची शक्यता आहे.

बाजार समितीची निवडणूक दोन दिवसांपूर्वी जाहीर झाली. सध्या येथे प्रशासक आहेत. 21 मार्चला निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. त्यानंतर राज्यात सत्ता आल्यावर प्रत्येक ठिकाणी उडी घेणाऱ्या शिंदे गटाने देखील त्यात रस घेतला. खासदार हेमंत गोडसे यांनी शिवाजी चुंभळे आणि भाजपचे दिनकर पाटील यांना एकत्र घेऊन पॅनेल निर्मितीची घोषणा केली होती.

त्यानंतर झालेल्या घडामोडींत माजी खासदार यांनी अतिशय गुप्तपणे निवडणुकीचे पॅनेल, प्रमुख नेत्यांशी संवाद, मतदारांशी संपर्क यातून आपली सर्व तयारी केली होती. आता त्यात शिवसेना नेते बबनराव घोलप यांनी रस घेतला आहे. वरिष्ठ सुत्रांच्या संकेतानुसार हे दोन्ही एकत्र येऊन महाविकास आघाडीचे पॅनेल तयार केले जाणार असल्याने विरोधकांना या निवडणुकीत चांगलेच झुंजावे लागेल असे दिसते.

शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या समन्वय समितीची बैठक उपनेते बबनराव घोलप यांच्या निवासस्थानी पार पडली. त्या वेळी संपूर्ण ताकदीनिशी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेण्यात आला. सोसायटी गटात ११, ग्रामपंचायत गटात चार, हमाल- मापारी एक तर व्यापारी गटात दोन अशा एकूण १८ जागांसाठी निवडणूक होणार आहे.

निवडणुकीसाठी ग्रामपंचायत गटासाठी २०७० तर सोसायटी गटासाठी एक जार ५९७ असे एकूण तीन हजार ६६७ मतदार आहेत. शिवसेनेकडे पॅनल करण्याइतके सक्षम उमेदवार आहेत. अनेकांनी निवडणूक लढविण्याची इच्छाही दर्शविली. इच्छुकांकडून अर्ज भरून घेण्यात येणार असून, नंतर त्यांची छाननी केली जाईल. मित्र पक्षाशी आघाडी करायची किंवा नाही याबाबतचा अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी घेणार असल्याचे उपनेते घोलप यांनी स्पष्ट केले.

शिवसेनेने गेल्यावेळी निवडणूक लढवली होती आणि त्यावेळी सहा उमेदवार निवडून आले होते. मात्र, या वेळी पक्षाला पोषक वातावरण असल्याने त्याचा पुरेपूर लाभ आम्ही उठवू, असे सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड म्हणाले. बैठकीस जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी आमदार वसंत गिते आदी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT