Congress Market Committee Election: पुर्ण ताकदीनीशी बाजार समिती निवडणूक लढविणार

Shirishkumar Kotwal News: माजी आमदार शिरीष कोतवाल यांच्या उपस्थितीत झालेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात आला निर्णय.
Shirishkumar Kotwal
Shirishkumar KotwalSarkarnama
Published on
Updated on

चांदवड : महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) घटक पक्षांकडून योग्य प्रस्ताव आला तर त्यावर सकारात्मक विचार करून आघाडी करू. तालुक्याच्या विकासासाठी जे सोबत येतील त्यांच्यासोबत तर जे सोबत येणार नाही त्यांच्या विरोधात तालुक्याच्या प्रगतीसाठी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी पॅनल तयार करून बाजार समितीच्या हितासाठी लढू व शेतकऱ्यांचे (Farmers) पॅनल तयार करू असे प्रतिपादन माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल (Shirish Kotwal) यांनी केले. (Ex MlA Shirishkumar Kotwal says if praposal came then will think for Front)

Shirishkumar Kotwal
Jayant Patil's Statement: भाजपमध्ये ‘राष्ट्रवादी’चा पराभव करण्याचे सामर्थ्य नाही

चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकी संदर्भात चर्चा करण्यासाठी चांदवड येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. बाजार समितीची निवडणूक पुर्ण ताकदीनिशी लढविणार असल्याचा निर्धार यावेळी उपस्थित पदाधिकारी, सरपंच उपसरपंच, अध्यक्ष व कार्यकर्त्यांनी केला.

Shirishkumar Kotwal
धक्कादायक...पुण्याच्या महिलेची मंत्रालयात आत्महत्या!

यावेळी माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांनी राज्यात सध्या काँग्रेस महाविकास आघाडीचा घटक आहे. सध्या सुरु असलेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्ष व नेत्यांनी रस आहे. त्यामुळे आघाडीच्या घटक पक्षांकडून योग्य व रास्त प्रस्ताव आल्यास त्याचा जरूर विचार करू.

चांदवड बाजार समितीच्या निवडणुकीत आम्ही स्वबळावर देखील निवडणुकीची तयारी ठेवली आहे. यंदाच्या निवडणुकीत आम्ही पुर्ण ताकदीनिशी मैदानात उतरू. शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही सर्वसमावेषक पॅनेल करण्याचा विचार केलेला आहे. त्याबाबत शेतकरी, मतदारांचा कल विचारात घेऊन उमेदवारी दिली जाईल.

Shirishkumar Kotwal
Muktainagar News : वंचिताच्या घरांसाठी रक्षा खडसे यांनी आणले ९० कोटी!

यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष संजय जाधव शिवाजी कासव, भीमराव निरभवने, माधव पवार, अरुण पगार, दत्तू मामा ठाकरे, विलास निकम, बाबाजी वाघचौरे, खंडू साठे, आनंदा ससांरे, भरत ठाकरे, मनोज किरकाडे, शिवाजी निकम, भीमराव जेजूरे, विजय कुंभार्डे, संपतराव वक्ते, संजय जाधव यांनी विविध सुचना केल्या.

यावेळी भीमराव जेजुरे, समाधान जामदार, शिवाजी कासव, उत्तमराव ठोंबरे, पंकज दखणे, भीमराव निरभवने, शंकर शिरसाठ, बापू शिंदे, विश्वनाथ ठोके, खंडेराव सोमवंशी, भरत ठाकरे, संपतराव वक्ते, विजय कुंभार्डे, ज्ञानेश्वर जाधव, भारत ढगे, कैलास सावकार, पप्पू कोतवाल, निरंजन जाधव, कांतिलाल निकम यांच्यासह सर्व मतदार व कार्यकर्ते उपस्थित होते.

Shirishkumar Kotwal
Nashik APMC News : राष्ट्रवादीच्या स्वतंत्र मोर्चेबांधणीने महाविकास आघाडीबाबत संभ्रम!

निवडणूकीसाठी इच्छुक उमेदवार

चांदवड बाजार समितीच्या निवडणुकीत माजी आमदार कोतवाल यांच्या पॅनेलकडे अरुण पगार, भीमराव निरभवने, विलास निकम, बाबाजी वाघचौरे, आनंदा संसारे, भरत ठाकरे, सुनील पाचोरकर, उत्तमराव ठोंबरे, दयानंद आहिरे, राजेंद्र देवरे, राजेंद्र गांगुर्डे, माधव पवार, भारत ढगे, भीमराव जेजूरे, गोरक्षनाथ पुरकर, ज्ञानेश्वर जाधव, सागर निकम यांनी उमेदवारी मागितली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com