Congress celebration Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Kernataka election : दक्षिण भारत भाजपमुक्त करीत काळाने भाजपवर सुड उगावला!

कर्नाटकातील विजयाने धुळे शहरात महाविकास आघाडीतर्फे जल्लोष.

Sampat Devgire

Dhule Congress : भारतीय जनता पक्षाने विकासाची खोटी स्वप्न दाखवून केंद्रातील सत्ता मिळवली. त्यानंतर मात्र त्यांनी धार्मिक विद्वेष, खाजगीकरण, विरोधी पक्षांवर सुड उगवणे हे काम केले. त्यांनी जे पेरले ते उगवले असुन कर्नाटकातील जनतेने भाजपमुक्त दक्षिण भारत अशी स्थिती केली आहे, असे डॉ. अनिल भामरे यांनी सांगितले. (Karnataka people made BJP less South India)

धुळे (Dhule) शहरात महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांनी कर्नाटकातील (Karnataka) विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला (Congress) बहुमत मिळाल्याने पेढे वाटले. यावेळी नेत्यांनी ही आगामी विधानसभा, लोकसभा निवडणुकांची नांदी असल्याचे म्हटले.

कर्नाटकमधील काँग्रेस विजयामुळे महाविकास आघाडीतर्फे धुळ्यात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. पेढे वाटले. काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळविले. शहर- जिल्हा काँग्रेस आणि महाविकास आघाडीने शहरातील काँग्रेस भवन येथे शनिवारी आनंदोत्सव साजरा केला. विजयाच्या घोषणा दिल्या.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने कर्नाटकमध्ये सर्वाधिक १३६ जागा प्राप्त करून स्पष्ट बहुमत मिळविले. काँग्रेसने भाजपला धोबीपछाड दिली. या पार्श्वभूमीवर प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहर व जिल्हा काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी महाविकास आघाडीतर्फे डॉ. अनिल भामरे यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम झाला.

कर्नाटकप्रमाणेच महाराष्ट्रातही काँग्रेस महाविकास आघाडीचे सरकार येईल, असा विश्वास डॉ. भामरे यांनी व्यक्त केला. पंचायत समितीचे माजी सभापती भगवान गर्दे, साबीर शेख, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रणजित भोसले, बाजार समितीचे संचालक साहेबराव खैरनार, बाजीराव पाटील, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस युवराज करनकाळ, धुळे तालुका काँग्रेसचे कार्याध्यक्ष अशोक सुडके, शिवाजी अहिरे, ज्येष्ठ नेते रमेश श्रीखंडे, राजेंद्र भदाणे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गणेश गर्दे यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT