Jalgaon News : महाविकास आघाडीसारखा प्रयोग केल्यास भाजपचा पराभव अटळ!

कर्नाटकमधील कॉंग्रेसचा विजय देशासाठी दिशादर्शक असल्याची प्रतिक्रीया जळगावच्या नेत्यांनी व्यक्त केली.
Shirish Choudhary, Dr. Ulhas Patil & Eknath Khadse
Shirish Choudhary, Dr. Ulhas Patil & Eknath KhadseSarkarnama
Published on
Updated on

Karnataka results : कर्नाटक विधानसभा निवडणूकीत जनतेने कॉंग्रेसला दिलेले स्पष्ट बहुमत देशाला आगामी काळात राजकीयदृष्ट्या दिशादर्शक ठरणारे आहे. महाविकास आघाडीसारखा प्रयोग केल्यास देशात भाजपचा पराभव अटळ आहे, असे मत जळगावच्या राजकीय नेत्यांनी व्यक्त केले आहे. (If Opposition will organise like Mahavikas Front BJP will fall down)

कर्नाटक (Karnataka) विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपचा (BJP) पराभव झाला. काँग्रेसला (Congress) स्पष्ट बहुमत मिळाले. मतदारांनी अतिशय चौकसपणे मतदान करीत त्रिशंकु स्थिती आणि तोडफोडीच्या राजकारणाला वाव ठेवला नाही. याबाबत जळगावच्या विविध नेत्यांनी समाधान व्यक्त केला.

Shirish Choudhary, Dr. Ulhas Patil & Eknath Khadse
Karnataka Election : ही तर देशातील परिवर्तनाची नांदी!

या निकालावर प्रतिक्रीया व्यक्त करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार एकनाथ खडसे म्हणाले, भाजपने देशात जोडतोडीचे राजकारण सुरू केले आहे. कर्नाटकातही त्यांनी हाच प्रकार केला होता. ते जनतेला आवडलेले नाही. जनता अशा गोष्टींना नाकारते. त्यामुळेच कॉंग्रेसला एकहाती सत्ता देऊन कर्नाटकातील जनतेने भाजपला उत्तर दिले आहे. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी केलेला जोरदार प्रचार करीत महागाई, बेरोजगारीवर भर दिला. भाजपतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठ्या सभा घेतल्या मात्र त्याचा काहीही परिणाम झाल्याचे दिसून आलेले नाही. आगामी काळात देशात महाविकास आघाडीसारखे संघटन केल्यास भाजपचा पराभव निश्‍चित होईल.

हा निकाल देशाला दिशादर्शक ठरेल असे काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब पवार यांनी व्यक्त सांगतिले. ते म्हणाले, निवडणूकीचा निकाल खऱ्या अर्थाने देशाला दिशादर्शक ठरणार आहे. पक्षाचे नेते राहूल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो यात्रेला जनतेने जोरदार प्रतिसाद दिला. त्या यात्रेचेच हे यश आहे. सत्तेच्या काळात भारतीय जनता पक्षाने घटनेची पायमल्ली केली. त्याला जनतेने उत्तर दिले आहे. आगामी निवडणूकीतही देशात भाजपला जनता नाकारणार आहे.

Shirish Choudhary, Dr. Ulhas Patil & Eknath Khadse
Karnataka Election : भाजपला इतक्या कमी जागा मिळतील याची अपेक्षा नव्हती.

काँग्रेसचे आमदार शिरीश चौधरी यांनी हा विजय हा काँग्रेससाठी आनंददायी, आशादायक आहे. कर्नाटकातील जनतेने लोकशाही विरोधी राज्यकर्त्यांना सत्तेवरून बाजूला हटवले. काँग्रेसवर विश्‍वास ठेवून यश मिळवून दिले आहे. यामुळे जनतेसाठी काम करण्याची काँग्रेसची जबाबदारी वाढली आहे.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि प्रियंका गांधी यांच्यासह कर्नाटकातील स्थानिक नेत्यांनी सोनिया गांधींच्या नेतृत्वाखाली हा विजय खेचून आणला. यातून भारतभर एक सकारात्मक संदेश जाईल. काँग्रेसच्या सर्वच नेत्यांनी एकत्र येऊन निवडणुका लढल्यास कर्नाटकसारखे यश मिळवणे कठीण नाही.

Shirish Choudhary, Dr. Ulhas Patil & Eknath Khadse
MNS News: कर्नाटक निकालावरुन मनसे नेत्याचा फडणवीस,ठाकरेंवर निशाणा; '' महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल करणाऱ्या...''

नवीन पर्वाची सुरवात

माजी खासदार डॉ. उल्हास पाटील म्हणाले, कर्नाटकामध्ये काँग्रेसने प्राप्त केलेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल सर्वप्रथम तमाम कर्नाटकच्या जनतेपुढे नतमस्तक आहे. श्रीमती सोनिया गांधी, प्रियंका गांधी, राहूल गांधी यांच्यासह मल्लिकार्जुन खर्गे, डी. के. शिवकुमार अणि सिद्धरमय्या यांचे अभिनंदन. अनेक वर्षांपासून काँग्रेसचा विजय थोडक्यात हुकत होता. मागील वेळेसही कर्नाटकात काँग्रेसचे सरकार होते. मात्र विरोधी पक्षाने वेगवेगळ्या पद्धतीने प्रलोभने देवून सरकार घालविले होते. यामुळे जनतेच्या मनात असंतोष निर्माण झाला होता. कनार्टकातील विजयामुळे आता बीजेपीसाठी दक्षिणेचे द्वार बंद झाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com