Devendra Fadnavis Eknath Shinde Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

MLC Election : शिंदेंच्या शिवसेनेला हव्यात 6 जागा, भाजपने दाखवली 4 ची तयारी ; नाशिक व संभाजीनगरवरुन गाडी अडली

MLC Election, Shiv Sena seats, BJP seat sharing : महायुतीमधील भाजप-शिवसेना व राष्ट्रवादी मधील जागा वाटपाचे सूत्र आजून ठरलेलं नाही. भाजप-शिवसेनेत दोन जागांवरुन गाडी अडली आहे.

Ganesh Sonawane

MLC Election : विधान परिषदेच्या १७ जागांसाठी निवडणूका जाहीर झालेल्या असून १८ जून पासून निवडणूक होणार आहे. मात्र, महायुतीमधील जागावाटपाचे सूत्र आजून ठरलेलं नाही. याउलट गुंता दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आता दोन जागांवरुन गाडी अडली आहे. मात्र, याबाबत लवकरच निर्णय होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने १७ पैकी ६ जागांची मागणी भाजपकडे केल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून कळते आहे. त्यात ठाणे, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, संभाजीनगर-जालना, नाशिक, जळगाव आणि परभणी-हिंगोली अशा सहा जागांचा समावेश आहे.

परंतु, भाजपने शिवसेनेला जास्तीत जास्त ४ जागा सोडण्याची तयारी दर्शविल्याने तिढा कायम असल्याचे सांगितले जात आहे. छत्रपती संभाजीनगर- जालना आणि नाशिक या दोन जागांबाबत तिढा असल्याचे संकेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. काल या दोन जागांवर आमची चर्चा सुरु असल्याचं फडणवीस म्हणाले होते.

छत्रपती संभाजीनगर व नाशिक बाबत आमची शिवसेनेसोबत तर पुण्याच्या जागेबाबत राष्ट्रवादीशी चर्चा सुरु असल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलं होतं. दरम्यान सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाजपने पुण्याऐवजी परभणी-हिंगोलीची जागा राष्ट्रवादीला देऊ केली आहे. तर नाशिकची जागा आपल्याकडेच ठेवा, असा आग्रह भाजपच्या स्थानिक नेत्यांनी धरला आहे.

मात्र, नाशिकमध्ये मागच्यावेळी शिवसेनेचे नरेंद्र दराडे आमदार होते म्हणून शिवसेनेने याहीवेळेला नाशिकवर दावा सांगितला आहे. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी देखील काल माध्यमांशी बोलताना तशीच इच्छा व्यक्त केली. दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि महसूल मंत्री बावनकुळे यांनी सोमवारी रात्री मुख्यमंत्र्यांशी यासंदर्भात चर्चा केल्याची माहिती आहे.

शिंदेची दिल्ली वारी

विधान परिषदेच्या नाशिक व संभाजीनगर या दोन जागांवरील वाटपाचा तिढा कायम असताना उपमुख्यमंत्री शिंदे अचानक दिल्लीला गेले. भाजपच्या वरीष्ठ नेत्यांची त्यांनी गुप्त भेट घेतली. आपल्या पक्षाला किमान सहा जागा द्याव्यात, असा आग्रह त्यांनी दिल्लीतील भाजप नेतृत्वाकडे धरला असल्याची माहिती आहे.

जळगावरुन रस्सीखेच

नाशिकप्रमाणेच जळगावच्या जागेवरही स्थानिकपातळीवर भाजप-शिवसेना नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरु आहे. जळगाव ही भाजपचा बालेकिल्ला असून ही जागा शिंदेसेनेला दिली जाणार या चर्चेमुळे भाजपच्या स्थानिक नेत्यांमध्ये अस्वस्थता आहे. त्यामुळे भाजपचे स्थानिक आमदार सुरेश भोळे यांनी ही जागा भाजपच लढणार असल्याचं म्हटलं आहे. आपले संख्याबळ अधिक असताना शिंदेसेनेला जागा का द्यायची? असा सवाल जिल्ह्यातील भाजप नेत्यांनी पक्षनेतृत्वाला केल्याचे सांगितले जात आहे. शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील व आमदार किशोर पाटील दोघांनी हे जागा शिवसेनेकडे खेचण्यासाठी बळ लावलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT