Jalgaon MLC Election : जळगावच्या जागेसाठी शिवसेना आक्रमक ; भाजपपुढे ठेवला जागा देता की लढता हा पर्याय!

Jalgaon MLC Election : गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाला शिवसेना शिंदेंच्या नेत्यांचे जळगाव मध्ये आव्हान. आमदार किशोर पाटील म्हणाले, एकतर जागा सोडणे किंवा मैत्रीपूर्ण लढतीसाठी तयार राहणे हाच पर्याय.
Girish Mahajan & Kishor Patil
Girish Mahajan & Kishor PatilSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon MLC Election : जळगाव विधान परिषदेची निवडणूक महायुतीसाठी परीक्षा घेणारी ठरण्याची चिन्हे आहेत. भाजप कोणत्याही स्थितीत ही जागा सोडण्याच्या मनस्थितीत नाही. त्यामुळे येथे नेतृत्वाचा मोठा संघर्ष निर्माण होऊ शकतो.

जळगाव विधान परिषदेची जागा कोणत्याही स्थितीत शिवसेना सोडणार नाही. या संदर्भात पक्षाच्या आमदारांनी वज्रमुठ केली आहे. हे सर्व नेते उद्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत.

जळगाव हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. त्या दृष्टीने गिरीश महाजन यांनी भाजपचा उमेदवार देखील निश्चित केल्याचे बोलले जाते. विद्यमान आमदार याच पक्षाचा असल्याने कार्यकर्त्यांमध्ये तशी मानसिकता आहे.

सध्या मात्र विधानसभेला भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात झालेल्या वादाची पुनरावृत्ती विधान परिषदेत होण्याची चिन्हे आहेत. मतदार संख्येच्या दृष्टीने दोन्ही पक्ष प्रबळ आहेत. त्यामुळे कोणीही माघार घेण्याच्या मनस्थितीत नाही.

विशेषता नेत्यांना आपल्या पुढच्या पिढीचे राजकीय पुनर्वसन करायचे आहे. त्यामुळे ही संधी सोडण्याची कोणाचीही तयारी नाही. नेत्यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न असल्याने अन्य नेत्यांनीही मतभेद विसरून एकोपा दाखविला आहे.

Girish Mahajan & Kishor Patil
Jalgaon MLC Election : भाजप आमदाराने घेतलेल्या एका भूमिकेने शिवसेनेच्या दोन नेत्यांचे स्वप्न भंगणार? जळगावच्या जागेवरुन रण तापलं..

आमदार किशोर पाटील यांनी याबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. जिल्ह्यात खासदार, महापौर, स्थायी समिती सभापती आणि बहुतांशी पदे भाजपकडे आहेत. संख्यात्मक दृष्टीने दोन्ही पक्ष तुल्यबळ आहेत.

या पार्श्वभूमीवर भाजपने मनाचा मोठेपणा दाखवून विधान परिषदेचे जागा शिवसेनेला सोडावी. या संदर्भात आमचे एकमत झाले आहे. सर्व नेते उद्या उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन ही भूमिका स्पष्ट करणार आहे.

Girish Mahajan & Kishor Patil
Nashik Crime : जमीन बळकावली अन् 90 लाखांची खंडणी, राष्ट्रवादीचा माजी नगरसेवक अडचणीत, पोलिसांनी घेतली मोठी अ‍ॅक्शन

भाजपला विधान परिषदेची जागा सोडणे किंवा मैत्रीपूर्ण लढतीसाठी तयार राहणे हाच पर्याय असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. दुसरीकडे हा थेट गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाला आव्हान देण्याचा प्रकार मानला जातो. त्यामुळे विधान परिषदेची निवडणूक महायुतीसाठी नवा पेच निर्माण करू शकते.

विधान परिषदेच्या जागेवर मैत्रीपूर्ण लढत झाल्यास भाजपचे सर्व विरोधक पडद्यामागून वेगळी खेळी करण्याची शक्यता आहे. विशेषतः मंत्री महाजन यांना आव्हान देण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते वेगळा डाव खेळू शकतात. हा राजकीय धोका लक्षात घेता महाजन समर्थक सावध झाले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com