Sadhvi Pradnya Singh Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Malegaon blast verdic : मालेगाव निकालानंतर जल्लोष करणाऱ्या हिंदुत्ववादी संघटना अडचणीत येणार, माजी आमदाराने अशी काय मागणी केली?

Malegaon bomb blast : मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल लागला परंतु त्यानंतर येथील वाद अधिक चिघळला आहे. राज्य सरकारने या निकालाच्या विरोधात फेरयाचिका दाखल करण्याची मागणी होत आहे.

Ganesh Sonawane

Malegaon blast verdic : मालेगावच्या भिक्कू चौकात २००८ मध्ये बॉम्बस्फोट झाला होता. (२९ सप्टेंबर ) ला झालेल्या या स्फोटाने मालेगाव शहर हादरलं होतं. या स्फोटात सहा निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता. तर १०० हुन अधिक जण यात जखमी झाले. १७ वर्षानंतर या प्रकरणाचा निकाल लागला असून एनआयए विशेष न्यायालयाने यातील सातही आरोपींना निर्दोष मुक्त केले आहे.

३१ जुलै २०२५ रोजी न्यायालयाने मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल सुनावला. आरोपींना न्यायालयाने निर्दोष सोडल्यानंतर मालेगावकरांवर अन्याय झाला आहे. राज्य सरकारने या निकालाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करावी. अशी मागणी माजी आमदार आसिफ शेख यांनी केली आहे. इतकच नव्हे तर निकाल लागल्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांनी जल्लोष केला होता. त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी आमदार आसिफ शेख यांनी केली आहे. स्फोटातील मृतांच्या नातेवाईकांनीही जल्लोषावर आक्षेप घेतला आहे.

मायनॉरिटी डिफेन्स कमिटीतर्फे सोमवारी येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आलं. या बॉम्बस्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांच्या हस्ते तहसीलदार विशाल सोनवणे यांना निवेदन देण्यात आले. एनआयए विशेष न्यायालयाने दिलेल्या निकालाविरोधात राज्य सरकारने पुढच्या आठ दिवसांत उच्च न्यायालयात आव्हान देणारी याचिका दाखल करावी. आम्हाला न्याय पाहिजे. भिक्कू चौकात बॉम्बस्फोटातील आरोपी मुक्त का असा सवाल करत त्यांनी आक्रोश केला व घोषणा दिल्या.

तसेच हा निकाल ऐकूण मृत फरीनचे वडील यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. लियाकत शेख म्हणाले की माझी मुलगी दोन वेळा मारली. सरकारने तपास यंत्रणेवर दबाव आणला असेल असा आरोप त्यांनी केला. जे या स्फोटात मृत झाले व जखमी झाले त्यांना न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी केली. तर राज्य सरकारने १४ ऑगस्टपर्यंत या निकालाला आव्हान देणारी याचिका दाखल करावी. अशी मागणी मुश्तकीम डिग्निटी यांनी केली.

निकालानंतर हिंदुत्ववादी संघटनांनी जल्लोष का केला?

मालेगावात स्फोट झाल्यानंतर जेव्हा या घटनेचा तपास सुरु झाला तेव्हा काही लोकांनी याला भगवा दहशतवाद असं संबोधलं होतं. प्रत्यक्षात या स्फोटाचा निकाल लागल्यानंतर साध्वी प्रज्ञा यांच्यासह सातही संशयित आरोपींची निर्दोष सुटका झाली. त्यामुळे हिंदुत्वादी संघटनांनी निकालानंतर जल्लोष केला. निकालानंतर भाजप व कॉंग्रेसमध्ये भगवा दहशतवाद या शब्दावरुन घमासान सुरु झालं आहे. स्वत:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निकाल लागल्यानंतर एक्स पोस्ट केली होती. त्यांनी म्हटलं होतं की, दहशतवाद ना कधी भगवा होता ना कधी राहणार असं त्यांनी म्हटलं होतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT