Asif Shaikh strategy for Malegaon SIR drive Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Malegaon SIR Drive: `इस्लाम` पक्षाच्या आसिफ शेख यांची मालेगावात व्युहरचना, `एसआयआर`चा हल्ला परतवण्यासाठी केली ही जोरदार तयारी!

Malegaon Islam Party Asif Sheikh SIR Voter List Drive Aware Malegaon Citizen: माजी आमदार आसिफ शेख म्हणाले, भाजपने मुस्लिम समाजाला टार्गेट करून सतत नवे कायदे करणे थांबवावे.

Sampat Devgire

Asif Shaikh News: मालेगाव शहरात निवडणूक आयोगाची एसआयआर मोहीम सुरू झाली आहे. यामध्ये मालेगाव शहराच्या नागरिकांना जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे नागरिकांनी जागरूक रहावे अन्यथा त्यांचा मतदानाचा हक्क हिरावला जाऊ शकतो, असा इशारा देण्यात आला आहे.

मालेगाव शहरात एसआयआर मोहिमेबाबत राजकीय पक्ष आणि कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत. इस्लाम पक्षाचे माजी आमदार आसिफ शेख यांनी याबाबत शहरवासीयांना अलर्ट राहण्याचा सल्ला दिला. गाफील राहिल्यास मोठा अन्याय होईल, असे ते म्हणाले.

भारतीय जनता पक्ष केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून मुस्लिम समाजाच्या पोटावर मारण्याचे काम करीत आहे. या समाजाची सातत्याने कोंडी करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यांना दिवसण्याचा राजकीय हेतू आता लपून राहिलेला नाही. मतदारयादीची दुरुस्ती आणि एसआयआर हा त्याचाच भाग असल्याचा आरोप त्यांनी केला.

यासंदर्भात मालेगावचे तहसीलदार आणि उपविभागीय अधिकाऱ्यांशी इस्लाम पक्षातर्फे शिष्टमंडळाने चर्चा केली. एस आय आर ही मोहीम राबविताना कोणावरही अन्याय होणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी. मतदार यादीतून परस्पर नावे वगळणे व अन्याय करणे टाळावे असे आवाहन करण्यात आले.

यासंदर्भात स्वतः तसेच मालेगावच्या महापौर नसरीन शेख यांसह सर्व नगरसेवक आणि कार्यकर्ते प्रत्येक प्रभागात मदत केंद्र सुरू करतील. कोणीही गाफील राहू नये. मतदार यादीत नाव कायम रहावे यासाठी प्रत्येक नागरिकांनी अर्ज भरून द्यावा असे आवाहन त्यांनी केले. 

मालेगाव शहर मध्य आणि बाह्य या दोन्ही मतदारसंघात यापूर्वी मॅपिंग करण्यात आले आहे. त्यात सुमारे 77 हजार मतदारांची नावे सापडलेली नाही. हा धोक्याचा इशारा आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी जागरूक राहून मतदार यादीत आपले नाव वगळले जाणार नाही याची दक्षता घ्यावी. त्यासाठी पक्षाचे कार्यकर्ते प्रत्येकाला मदत करतील असे त्यांनी सांगितले. 

भारतीय जनता पक्ष गेले काही दिवस मालेगाव शहराला जाणीवपूर्वक टार्गेट करीत आला आहे. या समाजाच्या पोटावर मारण्याचे काम सरकार करीत आले आहे. केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून आजवर एनआरसी ट्रिपल तलाक सीएए गोवंश हत्या बंदी यूजीसी असे कितीतरी कायदे केंद्र आणि राज्य सरकारने मुस्लिमांना त्रास देण्यासाठी केले आहेत. अशा स्थितीत प्रत्येकाने जागरूक राहून संयमाने वागावे. सरकार आणि समाजाच्या विरोधकांना कोणतीही संधी मिळणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. 

भाजप सरकारने सातत्याने कायदे आणि अन्य माध्यमातून मुस्लिम समाजावर हल्ले करणे थांबवावे. त्याऐवजी एकदाच काय कायदे करायचे किंवा देशाची घटना बदलायची ते बदलून दाखवावे. मुस्लिम समाज त्याला सामोरे जाण्यासाठी तयार आहे, असा इशारा माजी आमदार शेख यांनी यावेळी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT