Nashik MLC: 'इस्लाम'चे आसिफ शेख हे काय करून बसले?, सेक्युलर, सेक्युलर म्हणत नगरसेवकांचा कळप हिंदुत्ववाद्यांच्या दारी घेऊन गेले!

Asif Shaikh political move in Nashik MLC election: अपक्ष म्हणून गणेश गीते यांना सूचक असलेल्या इस्लाम पक्षाच्या त्या नगरसेवकांना आता पश्चाताप होतोय का?
Asif Shaikh & Asaduddin Owaisi
Asif Shaikh & Asaduddin OwaisiSarkarnama
Published on
Updated on

Asif Shaikh News: नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीत अपक्ष व गोकूळ गीते सोमवारी सकाळी निवडून आले. त्यंनी शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या नरेंद्र दराडे यांचा पराभव केला. त्यानंतर सायंकाळ होता होता स्वतः गीते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन या शासकीय निवासस्थानी हिंदूत्ववादी राजकारणाला शरण गेले.

नाशिक विधान परिषद निवडणुकीत गोकुळ गीते यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांचा महायुती अर्थात शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे नरेंद्र दराडे यांना कट्टर विरोध होता. दराडे हे अकार्यक्षम आणि निरुपयोगी आमदार असल्याचा आरोप त्यांनी केला होता. 

भाजपचे गणेश गीते यांच्या बंडखोरीला पक्षाने दबावाचे राजकारण आणून वेसन घातले. त्यातून गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते यांच्या उमेदवारीला प्रोत्साहन देण्यात आले. ही उमेदवारी मुख्यतः महायुतीच्या विरोधात होती. 

Asif Shaikh & Asaduddin Owaisi
MLC Election : वाद मिटवायला आलेले उदय सामंत नवा वाद निर्माण करून गेले! नरेंद्र दराडे 'डेंजर झोन'मध्ये?

महायुतीला विरोध म्हणून मालेगावच्या एमआयएम आणि इस्लाम या दोन्ही पक्षांनी उत्साहाने गीते यांना पाठिंबा दिला होता. यासंदर्भात माजी आमदार आणि पक्षप्रमुख आसिफ शेख यांनी जाहीर भूमिका घेतली होती. शिवसेना शिंदे पक्षाचे दराडे यांच्यावर त्यांनी अतिशय गंभीर टीका केली होती. 

Asif Shaikh & Asaduddin Owaisi
Nashik MLC Election: सर्व १४ अर्ज वैध! शिवसेनेच्या नरेंद्र दराडेंना भाजपचे बंडखोर गोकुळ गीतेंचं आव्हान कायम

माजी आमदार आसिफ शेख यांचे मालेगाव शहरातील राजकारण प्रामुख्याने सेक्युलर धोरणावर सुरू आहे. याबाबत त्यांनी वारंवार पुनरुच्चार केला आहे. स्थानिक राजकारणात त्यांचे "एमआयएम" या पक्षाशीही त्यांचे सख्य होऊ शकले नाही.

माजी आमदार असिफ शेख यांच्या पक्षाच्या दहा नगरसेवकांनी गोकुळ गीते यांच्या उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून सह्या केल्या आहेत. मालेगाव येथील नगरसेवकांनी आपल्याला सुरुवातीपासूनच पाठिंबा जाहीर केल्याचे गोकुळ गीते यांनी स्पष्ट केले आहे. गोकुळ गीते यांनी प्रचार थांबवल्यावर मालेगाव येथील नगरसेवकांनी खंत व्यक्त केली होती.

मात्र निवडणुकीत एक नगरसेवक वगळता जिल्ह्यातील सर्वांनी शंभर टक्के मतदान केले. त्यामुळे माजी आमदार आसिफ शेख यांनी सेक्युलर राजकीय भूमिका घेत आपल्या मतदारांचा कळप कट्टर हिंदुत्ववादी असा दावा करणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला पाठिंबा देणाऱ्या उमेदवाराकडे नेला. त्यांना आपल्या या निर्णयाचा पश्चाताप होतो की काय अशी स्थिती आहे. यावर ते काय भूमिका व्यक्त करतात याची मोठी उत्सुकता आहे. 

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com