Asif Shaikh News: मालेगाव महापौर पदासाठी माजी आमदार असिफ शेख यांनी कंबर कसली आहे. महापौर पदासाठी मॅजिक फिगर गाठण्यासाठी हालचाली जोरात आहेत. त्यामुळे रोज नव्या राजकारणाच्या चर्चा आहेत.
महापौर पदासाठी काहीही करण्याची तयारी राजकीय नेत्यांची असते. धर्मनिरपेक्ष असा दावा करणाऱ्या माजी आमदार आसिफ शेख यांनीही असेच डाव टाकले आहेत. त्यामुळे मालेगावचे राजकारण पुन्हा एकदा नव्या वळणावर आले आहे.
माजी आमदार असिफ शेख आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे नेते शिक्षण मंत्री दादा भुसे यांचे मधुर संबंध सर्वश्रुत आहेत. हे संबंध पुन्हा एकदा आसिफ शेख यांच्या मदतीला धावून येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे मालेगावच्या राजकारणात मोठा भूकंप होऊ शकतो.
मालेगाव महापौर पदासाठी माजी आमदार असिफ शेख एकाच वेळी अनेक पक्षी मारण्याच्या विचारात आहेत. कट्टर विरोधक एम आय एम चे आमदार मौलाना मुक्ती इस्माईल यांना त्यांनी पाठिंबासाठी प्रस्ताव दिला होता. हा प्रस्ताव त्याच राजकारणाचा भाग आहे. त्यातून एमआयएमची राजकीय कुंडी करण्यात ते यशस्वी झाले आहेत.
सध्या 40 नगरसेवक आसिफ शेख यांच्या गोटात आहेत. त्यांना अवघ्या तीन सदस्यांची गरज आहे. सध्या काँग्रेसकडे तीन नगरसेवक आहेत. अन्य तीन मिळून सहा जणांचा गट काँग्रेस नोंदवणार आहे. काँग्रेस पक्षाने माजी आमदार शेख यांना पाठिंबा देण्याची तयारी दाखविली आहे.
याच दरम्यान काँग्रेसचे नेते एजाज बेग यांनी सोशल मीडियावर आपले स्टेटस बदलले आहे. या स्टेटसवर एका हातात उपमहापौर पदाची खुर्ची तर दुसऱ्या हातात स्थायी समिती सभापतीची खुर्ची असे चित्र आहे. त्यातून पाठिंब्याच्या बदल्यात काँग्रेसच्या अपेक्षा काय? हे स्पष्ट होते.
काँग्रेस नेते आसिफ बॅग पाठिंबाच्या बदल्यात बरेच काही मिळवू इच्छितात. त्यामुळे त्यांचे हे स्टेटस चर्चेचा विषय आहे. या स्टेटस मुळे सावध झालेल्या माजी आमदार आसिफ शेख यांनी पडद्यामागे पुन्हा एकदा आपला हुकमाचा एक्का काढण्याची तयारी केली आहे.
गेल्या पाच वर्षात मालेगाव महापालिकेत आसिफ शेख यांचे कुटुंबीय महापौर होते. यावेळी मंत्री दादा भुसे त्यांच्या सत्तेत सहभागी होते. महापौर पद भुसे यांच्याकडे राहिले. हिंदुत्वाचे राजकारण करणाऱ्या शिवसेना शिंदे पक्षाने मालेगावात मात्र चक्क मुस्लिमांचे राजकारण जवळ केले होते. यंदाही पुन्हा एकदा त्याची पुनरावृत्ती होण्याची चाहूल लागली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.