Girish Mahajan : 'राम नाम जपना आणि पराया माल अपना' असं उद्धव ठाकरेंचं धोरण...'; भाजप नेत्याने डिवचलं

Girish Mahajan Remark on Uddhav Thackeray: 'राज्यातील महापालिका निवडणुकांमध्ये विरोधक हे काही महापालिकेत सत्तेवर येणार नाहीत, या आपल्या विधानाची त्यांनी आठवण करून दिली. विरोधकांचे अस्तित्व निवडणुकीत कुठेही जाणवले नाही. कोणीही नेता प्रचाराला फिरकला नाही. त्यामुळे विरोधक आत्मविश्वास गमावून बसले आहेत.'
Girish Mahajan Takes Dig at Uddhav Thackeray, BJP Leader Sparks Political Row
Girish Mahajan Takes Dig at Uddhav Thackeray, BJP Leader Sparks Political RowSarkarnama
Published on
Updated on

Nashik News, 22 Jan : महापालिका निवडणुकांची गट नोंदणी सुरू झाली आहे. त्यासाठी पुन्हा एकदा नगरसेवकांची फोडाफोडी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते गिरीश महाजन यांनी विरोधकांना ललकारले आहे.

नाशिक जळगाव धुळे आणि अहिल्यानगर महापालिकांच्या भाजप नगरसेवकांची गट नोंदणी बुधवारी झाली. यावेळी गिरीश महाजनांनी नवनिर्वाचित नगरसेवकांना मार्गदर्शन केले. यानिमित्ताने त्यांनी भाजपच्या निवडणुकीतील चुकाही सांगितल्या.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या परदेशात आहेत. ते राज्यात परतल्यावरच सध्या सुरू असलेल्या कल्याण डोंबिवली येथील घडामोडींवर बोलतील. भाजपला राज्यात महापालिका निवडणुकांमध्ये चांगले यश मिळाले, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

यावेळी मंत्री महाजन यांनी विरोधकांना पुन्हा एकदा ललकारले. विरोधकांकडे कोणीही नेता नाही. उद्धव ठाकरे हे फक्त मुंबई महापालिकेवरच लक्ष ठेवून होते. 'राम नाम जपना आणि पराया माल अपना' असे त्यांचे धोरण आहे.

Girish Mahajan Takes Dig at Uddhav Thackeray, BJP Leader Sparks Political Row
Murlidhar Mohol : पुण्यातील 'ते' भाजप नेते नगरसेवक पदापासून दूर राहणार ; मंत्री मुरलीधर मोहोळांचा इशारा

राज्यातील महापालिका निवडणुकांमध्ये विरोधक हे काही महापालिकेत सत्तेवर येणार नाहीत, या आपल्या विधानाची त्यांनी आठवण करून दिली. विरोधकांचे अस्तित्व निवडणुकीत कुठेही जाणवले नाही. कोणीही नेता प्रचाराला फिरकला नाही. त्यामुळे विरोधक आत्मविश्वास गमावून बसले आहेत, असे ते म्हणाले.

नाशिक मध्ये दहा नगरसेवकांनी भाजपशी संपर्क केल्याचा दावा त्यांनी केला. आपण मात्र कोणाशीही संपर्क केलेल्या नाही, हे देखील त्यांनी सांगितले. राज्यभरातील नगरसेवकांना भाजपमध्ये यायचे आहे. तसे संकेत मिळत आहेत.

Girish Mahajan Takes Dig at Uddhav Thackeray, BJP Leader Sparks Political Row
Girish Mahajan : शिंदेंच्या शिवसेनेला महापालिकेच्या सत्तेत सहभागी न करण्याचे महाजनांनी दिले संकेत; म्हणाले, युतीत 70 जागाही आल्या नसत्या...

संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला महाजन यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, संजय राऊत यांच्याकडे बोलण्यासारखे काहीही राहिलेले नाही. त्यांचे सध्याचे वक्तव्य म्हणजे, "गिरे तो भी मेरी टांग उपर" असे आहे.

एकंदरच महापालिका निवडणुकांमध्ये उत्तर महाराष्ट्रात भाजपला घवघवीत यश मिळाले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पक्षात मंत्री महाजन यांचा धबधबा वाढणार आहे. तो आत्मविश्वास त्यांच्या वक्तव्यात जाणवत होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com