Congress Politics News: मालेगाव महापौर पदाच्या निवडणुकीत काल मोठी खेळी झाली. एकमेकांचे कट्टर विरोधक असलेल्या काँग्रेस आणि भाजपने एकमेकांना टाळी दिली. त्यामुळे महापौर पदाची निवडणूक सोपी झाली.
मालेगाव महापालिकेत काँग्रेस पक्षाचे अवघे तीन नगरसेवक आहेत. भाजपचे दोन नगरसेवक आहेत. मात्र या पाच नगरसेवकांच्या दोन्ही पक्षांनी एकमेकांना टाळी देत अनेकांची कोंडी केली.
काँग्रेस आणि भाजपने एकत्र येत पाच सदस्यांच्या गटाची नोंदणी केली. त्यामुळे इस्लाम पक्षाचे माजी आमदार असिफ शेख यांच्या महापौर पदाच्या दावेदारीला बळ मिळाले. आसिफ शेख आणि समाजवादी पार्टी यांचे ३९ नगरसेवक आहेत.
मालेगाव महापौर पदासाठी शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे नेते आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी पडद्यामागे वेगळीच खेळी केली होती. सर्वाधिक नगरसेवक असलेल्या माजी आमदार असिफ शेख यांच्या इस्लाम पक्षाला कात्रजचा घाट दाखविण्याचा त्यांचा डाव होता. एमआयएम पक्षाने दादा भुसे यांना युतीचा प्रस्ताव दिल्याची चर्चा होती.
एम आय एम आणि शिवसेना एकत्र आल्यास त्यांना काँग्रेसच्या मतांची गरज होती. तसे झाल्यास माजी आमदार आसिफ शेख यांचा महापौर पदाचा दावा कमकुवत होणार होता. सर्वाधिक नगरसेवक असूनही ते सत्तेपासून लांब राहिले असते.
या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते एजाज बेग यांनी काल वेगळाच डाव टाकला. त्यामुळे एका दगडात दोन पक्षी मारण्यात ते यशस्वी झाले. एमआयएम आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष दोघांनाही त्यांनी सत्तेपासून दूर ठेवण्यात यशस्वी झाली.
भाजप आणि काँग्रेस हे दोन लहान पक्ष एकत्र आल्याने त्यांची सत्तेत वाटा घेण्याची तडजोडीची क्षमता वाढली आहे. या समीकरणांमुळे इस्लाम पक्षाचे माजी आमदार असिफ शेख यांच्याकडे आता भारतीय विकास आघाडी या नावाने 45 संख्याबळ झाले आहे. त्यामुळे एम आय एम आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे सत्तेचे स्वप्न भंगले.
------
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.