Ajit Pawar: पवार नावाचा वारसा अजून जिवंत आहे! राष्ट्रवादीचं नेतृत्व सुनेत्रा पवारांकडेच; नाशिकच्या नेत्यांनी घेतला भावनिक पुढाकार

Nashik NCP Ajit Pawar Nashik has become the center of political activities, Manikrao Kokate is the initiative-उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकीय हालचालींचे केंद्र बनले नाशिक
Ajit Pawar, Sunetra Pawar & Sharad Pawar
Ajit Pawar, Sunetra Pawar & Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

NCP News: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दोन दिवसांपूर्वी निधन झाले. त्यामुळे भविष्यात या पक्षाचे सूत्रे कोणाकडे जाणार? यावर काही नेते चर्चा करीत आहेत. यामध्ये नाशिकच्या नेत्यांनी महत्त्वाची भूमिका घेतली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या काही नेत्यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यामध्ये प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अतिशय वेगाने घडामोडी घडल्या

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी श्रीमती सुनेत्रा पवार यांची निवड होण्याची शक्यता आहे. आज याबाबत मुंबईत पक्षाच्या आमदारांची बैठक होणार आहे. यामध्ये या महत्त्वाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होईल.

Ajit Pawar, Sunetra Pawar & Sharad Pawar
Sunetra Pawar : उपमुख्यमंत्रीपदासाठी सुनेत्रा पवारांचे नाव जवळपास निश्चित; गटनेता निवड अन् शपथविधीची औपचारिकता बाकी

यासंदर्भात नाशिकच्या नेत्यांनी महत्त्वाची भूमिका घेतली. मुंबईत छगन भुजबळ यांनी त्यात सहभाग घेतला. ज्येष्ठ नेते म्हणून त्यांच्या या भूमिकेला सध्या तरी अन्य नेत्यांनीही समर्थन दिल्याचे चित्र आहे.

Ajit Pawar, Sunetra Pawar & Sharad Pawar
NCP Politics : "आता शरद पवार यांनीच पुढाकार घ्यावा..."; नरहरी झिरवाळ यांचं मोठं वक्तव्य

शुक्रवारी नाशिक मध्ये माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सिन्नर येथे बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यात पक्षाचे नेतृत्व सुनेत्रा पवार यांच्याकडेच सोपावे अशी आग्रही मागणी केली.

माजी मंत्री कोकाटे यांच्यासोबत आमदार हिरामण खोसकर, नितीन पवार आणि सरोज आहिरे यादेखील उपस्थित होत्या. अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ त्यांनीही याबाबत अनुकूल विधान केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या राजकीय हालचालींचे केंद्र नाशिक झाले आहे.

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी एकत्र यावे की नाही, हा पवार कुटुंबीयांचा प्रश्न आहे. त्यात हस्तक्षेप करण्याची आमची क्षमता नाही. तशी भूमिका घेण्याचा अधिकार आम्हाला नाही. मात्र पक्षाचे नेतृत्व कोणाकडे असावे, हा आमदारांचा आणि आमचा अधिकार आहे. त्यानुसार आम्ही ही भूमिका घेतली असे माजी मंत्री कोकाटे यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या विधिमंडळ सदस्यांची बैठकाज मुंबईत होणार आहे. पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल तसेच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी यासंदर्भात अधिक भूमिका जाहीर केली आहे. त्यामुळे आज विधिमंडळ नेतृत्वाचा निर्णय मार्गी लागणार आहे. त्यासाठी नाशिक मधून नेत्यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे चित्र आहे.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com