Malegaon Namaz Pathan FIR Sarkarnma
उत्तर महाराष्ट्र

Malegaon Mahapalika News: महापालिकेत नमाज पठण प्रकरणी विद्युत अभियंता निलंबित; प्रशासनाकडून गंभीर दखल

Malegaon Municipal Corporation Namaz Pathan News:विभागप्रमुख म्हणून बेजबाबदार असल्याचा ठपका अभिजित पवार यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यांच्यावर प्रशासनाने निंलबनाची कारवाई केली आहे.

Mangesh Mahale

Malegaon Politics: उपमहापौरांनी महापालिकेतील आपल्या कार्यालयात टिपू सुलतान यांचा फोटो लावल्याने वादात सापडलेली मालेगाव महापालिका सध्या राज्यात चर्चेचा विषय ठरली आहे.

महापालिकेत नमाज पठणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हा विषय विरोधकांनी लावून धरला होता याची दखल घेत मालेगाव प्रशासनाने मोठे पाऊल उचलेले आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.

विद्युतअभियंता अभिजित पवार यांना निलंबित करण्यात आले आहे. महापालिकेच्या विद्युत विभागाच्या कार्यालयात नमाज पठण झाल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर मालेगावात त्याचे तीव्र पडसाद उमटले होते. अनेकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली होती.

या पार्श्वभूमीवर विभागप्रमुख म्हणून बेजबाबदार असल्याचा ठपका अभिजित पवार यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यांच्यावर प्रशासनाने निंलबनाची कारवाई केली आहे. या घटनेमुळे महापालिकेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. शिस्तभंगाची नोंद घेत पुढील चौकशी सुरू आहे.

दोन दिवसापूर्वी पथदिव्यांचीतक्रार घेऊन महापालिकेत गेलेल्या संतप्त कार्यकर्त्यांनी थेट विद्युत अधीक्षकांच्या दालनातच नमाज पठण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शहरात मोठी खळबळ उडाली होती. पोलिसांनीमोठी कारवाई करत सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
‘लोक संघर्ष समिती’ या मालेगावातील संघटनेने शहरातील बंद पथदिव्याविषयी महापालिकेकडे अनेक तक्रारी केल्या होत्या. मात्र, प्रशासनाकडून त्याची दाद मिळाली नाही. त्यानंतर याबाबत समितीचे लुकमान कमाल आणि काही नागरिक गेल्या सोमवारी महापालिकेत गेले. तिथे विद्युत विभागाच्या अधीक्षकांना भेटण्यासाठी ते त्यांच्या कार्यालयात गेले.
अधीक्षक बैठकीसाठी बाहेर गेल्याने ते त्यांच्या दालनातच थांबले. बराच वेळ त्यांनी त्यांची वाट पाहिली. विद्युत अधीक्षक दालनात परतले नाहीत. सध्या रमजानचा महिना सुरु आहे. सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास नमाजाची वेळ झाली. बराच वेळ वाट पाहूनही अधिकारी न आल्याने उपस्थित नागरिकांनी थेट अधीक्षकांच्या रिकाम्या दालनातच नमाज पठण सुरू केले. या प्रकरणाचा व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT