

HSC Maths paper leak: बारावी पेपरफुटी तपासात नवा धक्कादायक खुलासा समोर येत आहे. बारावीचे दोन नव्हे तर तीन पेपर फुटल्याची माहिती आहे. राज्य परीक्षा बोर्डाकडून तपास सुरू झाला आहे, याला राज्य परीक्षा बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. तांत्रिक तपासात ही धक्कादायक बाब समोर आली आहे.
२५ प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रावर पाठवल्या होत्या पण २४ प्रश्नपत्रिकाच परीक्षा केंद्रावर पोहचल्या, अशी तक्रार केंद्र पर्यवेक्षकाने बोर्डाकडे केली आहे. विज्ञान शाखेचेच्या फिजिक्स, केमेस्ट्री, गणिताच्या पेपर संदर्भात ही बाब घडली आहे.
प्रेसमधून सीलबंद पाकिटे परीक्षेच्या दिवशी केंद्रावर पाठवली जातात, मग हा प्रकार कसा घडला? याबाबत आता सखोल चौकशी सुरु आहे. गणिताचाही पेपर फुटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपींच्या डिलीट चॅटमध्ये गणिताचाही पेपर डिजिटल पुरावे नागपूर पोलिसांच्या हाती लागले आहे.
18 फेब्रुवारी रोजी नागपूरमध्ये हा प्रकार घडला होता. फिजिक्स (Physics) आणि केमिस्ट्री (Chemistry) या दोन विषयांचे पेपर फुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. सेंट उर्सुला गर्ल्स हायस्कूल या परीक्षा केंद्रावर एका विद्यार्थिनीच्या संशयास्पद हालचालींमुळे हा प्रकार उघडकीस आला होता. ती विद्यार्थिनी वारंवार वॉशरूमला जात असल्यामुळे पर्यवेक्षकांना संशय आला.
विद्यार्थिंनीची तपासणी केली असता तिच्याकडे स्मार्ट फोन सापडला. या फोनमधील व्हॉट्सॲप ग्रुपवर परीक्षेपूर्वीच प्रश्नपत्रिका आणि त्यांची उत्तरे आलेली होती. तपासात असे समोर आले की, केवळ 18 फेब्रुवारीचा केमिस्ट्रीचाच नाही, तर 16 फेब्रुवारी रोजी झालेला फिजिक्सचा पेपरही अशाच प्रकारे व्हॉट्सॲपवर प्रसारित झाला असल्याचा तपासात आढळले आहे.
याप्रकरणी शिकवणी वर्गाच्या संचालकासह दोघांना अटक करण्यात आली. निशिकांत मून आणि फरहान अशी अटकेतील आरोपींची नावे आहे. पेपरफुट प्रकरणात आतापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आणखी काही जणांना समावेश असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.