Asif Shaikh| Dada Bhuse Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Malegaon Mahapalika : मालेगावात दादा भुसे पत्तेच ओपन करेना, फोडाफोडीच्या भीतीने सेक्युलर फ्रंट व कॉंग्रेसचे ४३ नगरसेवक पर्यटनाला

Malegaon Municipal Corporation : मालेगावात इस्लाम पार्टी आणि समाजवादी पार्टीच्या सेक्युलर फ्रंटने कॉंग्रेसला सोबत घेतले असून ४३ नगरसेवक सहलीला गेले आहे. अशात शिवसेनेची भूमिका गुलदस्त्यात असल्याने त्याकडे लक्ष्य आहे.

Ganesh Sonawane

Malegaon : मालेगाव महापालिका निवडणुकीत इस्लाम पक्षाने सर्वाधिक ३५ जागा जिंकत बाजी मारली. इस्लाम पक्षाने समाजवादी पक्षासोबत युती केली होती त्यांना ५ जागा मिळाल्या. इस्लाम पार्टी आणि समाजवादी पार्टीच्या सेक्युलर फ्रंटला शहरातून सर्वाधिक मताधिक्य मिळाले पण बहुमताचा ४३ हा जादुई आकडा पार करण्यासाठी कुणाचा तरी पाठिंबा आवश्यक होता. त्यामुळे सत्ता स्थापनेचा तिढा सुटलेला नव्हता.

अशात, येथील महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीचा मुहूर्त ठरला असून ७ फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे. अशात वेगवान हालचाली घडवून आणत इस्लाम पार्टी आणि समाजवादी पार्टीच्या सेक्युलर फ्रंटने कॉंग्रेसला सोबत घेतले असून सत्तास्थापनेसाठी आवश्यक असलेला ४३ हा जादुई आकडा काठावर का असेना गाठला आहे. काठावरचे बहुमत आहे. अशात फोडाफोडीचे राजकारण होऊ शकते या भीतीने निवडणुकीची तारीख जाहीर होताच इस्लाम पक्ष, समाजवादी पार्टी व कॉंग्रेसचे नगरसेवक सहलीला गेले असून पर्यटनाचा आनंद घेत आहेत.

कॉंग्रेसने सेक्युलर फ्रंटला पाठींबा देताना सुरुवातीला मोठ्या अटी शर्ती घातल्या होत्या. मात्र नंतर या अटी मागे घेत कॉंग्रेस सेक्युलर फ्रंटबरोबर येण्यास तयार झाली. कॉंग्रेसकडे तीन जागा आहेत. इस्लामच्या ३५ व समाजवादी पार्टीच्या पाच असे एकुण ४३ असे काठावरचे बहुमत होत आहे.तसेच इस्लाम पक्षाच्या नरसिन बानो खालीद शेख यांची महापौरपदी निवड निश्‍चित मानली जात आहे.

सेक्युलर फ्रंटने एमआयएम व कॉंग्रेस दोघांकडे बिनशर्त पाठींबा मागितला होता. परंतु एमआयएम ने प्रतिसाद देण्यात मोठा वेळ घालवला दरम्यानच्या काळात कॉंग्रेसने पाठिंबा जाहीर केला. मालेगावात आता सत्तास्थापनेच्या हालचाली गतिमान झाल्या असून इस्लाम पक्ष, समाजवादी पार्टी व कॉंग्रेस अशा तिघांचे ४३ नगरसेवक सहलीला रवाना झाले आहेत.

दरम्यान, २१ नगरसेवक असलेला एमआयएम विरोधी बाकावर बसण्याची शक्यता आहे. तर, शिवसेनेने देखील १८ जागांवर यश मिळविले आहे. मात्र शिवसेनेचे मंत्री दादा भुसे यांनी अद्याप आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवली आहे. शिक्षणमंत्री दादा भुसे व माजी आमदार आसिफ शेख अंतिम निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात आले होते. दरम्यान शिवसेना सत्तेत सहभागी झाल्यास शिवसेनेला उपमहापौर पद मिळू शकतं. मात्र याबाबतचा निर्णय अजूनही गुलदस्त्यात आहे. शिवसेना सत्तेत सहभागी झाल्यास समीकरणे बदलू शकता. कारण दादा भुसेंनी पाठिंबा दिल्यास सेक्युलर फ्रंट काठावरचे बहुमत घेण्यापेक्षा शिवसेनेसोबत सत्तेत जाऊ शकते असा अंदाजही व्यक्त करण्यात येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT