Malegaon Deputy Mayor Shan-e-Hind Tipu Sultan photo statement Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Tipu Sultan Portrait Row : दालनात टीपू सुलतानचा फोटो पुन्हा लावणार, मालेगावच्या उपमहापौर शान-ए-हिंद यांच्या वक्तव्याने राजकीय स्फोट

BJP reaction to Tipu Sultan photo in Malegaon civic office : हिंदू संघटनांकडून देण्यात आल्यानंतर मालेगाव मनपा प्रशासनाने उपमहापौर शान-ए-हिंद निहाल अहमद यांच्या दालनातील टीपू सुलतानचा फोटा हटवला होता.

Ganesh Sonawane

Malegaon Tipu Sultan Controversy: मालेगाव महानगरपालिकेतील नवनिर्वाचित उपमहापौर यांनी आपला पदभार स्वीकारताच नव्या वादाला तोंड फुटलं होतं. उपमहापौर शान-ए-हिंद निहाल अहमद यांनी आपल्या दालनात टिपू सुलतानचे छायाचित्र लावल्याने मोठा वाद निर्माण झाला, राजकीय युद्ध भडकलं. हिंदुत्ववादी संघटनांसह शिवसेना त्यापाठोपाठ भाजप आक्रमक झाली.

उपमहापौरांनी फोटो काढावा नाहीतर आम्ही स्वत: मालेगावात येऊन संबंधित फोटो काढू, असा इशारा हिंदू संघटनांकडून देण्यात आला होता. त्यानंतर स्थानिक प्रशासनाने उपमहापौरांच्या दालनातील टिपू सुलतानचा फोटो काढला होता. त्यानंतर हा वाद शांत होत नाही तोच उपमहापौर शान-ए-हिंद निहाल अहमद यांनी केलेल्या नव्या वक्तव्याने वादाची ठिणगी पडली आहे.

दालनाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर टिपू सुलतान यांचा फोटो पुन्हा लावण्यात येईल, असे वक्तव्य उपमहापौर शान-ए-हिंद निहाल अहमद यांनी केले आहे. मालेगाव शहरातील किल्ला परिसरात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात बोलताना उपमहापौर शान-ए-हिंद निहाल अहमद यांनी टिपू सुलतान यांची उघडपणे स्तुती केली.

फोटो लावणं चुकीचं नसल्याचा ठाम दावा त्यांनी केला. इंग्रजांविरोधात लढणाऱ्या योद्ध्याचा फोटो लावण्यात गैर काय? असा सवाल करत दालनाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा फोटो लावला जाईल असे त्यांनी स्पष्ट केल्याने मालेगाव शहरात पुन्हा एकदा राजकीय व सामाजिक वाद पेटण्याची शक्यता वाढली आहे.

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी याप्रकरणावर भाष्य करताना टीपू सुलतान यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली होती. ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी शौर्य आणि स्वराज्याचा विचार दिला त्याचप्रमाणे टिपू सुलतानानं काम केल्याची मुक्ताफळं सपकाळांनी उधळली. त्यामुळे राज्यभरात हा वाद पेटला.

त्यादरम्यान तिकडे मालेगावातील उपमहापौर दालनातील फोटो काढण्यात आला होता. मात्र, उपमहापौर शान-ए-हिंद निहाल अहमद यांनी पुन्हा फोटो लावणार असल्याचे वक्तव्य केल्याने हा वाद आणखी पेट घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मालेगावच्या महापौरपदी इस्लाम पक्षाच्या नसीरिन बानो खालीद शेख तर उपमहापौर पदी समाजवादी पार्टीच्या शान-ए-हिंद यांची निवड झाल्यानंतर उपमहापौर शान-ए-हिंद यांनी आपल्या दालनात टिपू सुलतान यांचे छायाचित्र लावल्यामुळे हा वाद सुरु झाला. सोशल मीडियावर हा फोटो व कार्यालयातील व्हिडीओ व्हायरल झाला होता. यानंतर विविध राजकीय पक्ष, हिंदुत्ववादी संघटना आणि नागरिकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT