

Maharashtra Politics : मालेगाव महापालिकेच्या नवनिर्वाचित मुस्लिम उपमहापौर शानेहिंद निहाल अहमद यांच्या दालनात टिपू सुलतान यांची प्रतिमा लावण्यात आल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. भाजपच्या इशाऱ्यानंतर हा फोटो काढण्यात आला असला तरी कॉंग्रेसप्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान याची छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना केल्याने राजकीय युद्ध भडकलं आहे.
सपकाळ यांच्याविरोधात भाजपसह हिंदुत्वादी संघटनांनी ठिकठिकाणी आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. दरम्यान यावर मराठी अभिनेते शरद पोंक्षे यांनी मालेगावच्या उपमहापौर यांच्या कृत्यावर टीका केली आहे. हिंदूवर अत्याचार करणाऱ्याचा फोटो आज मालेगाव महापालिकेच्या मुस्लिम उपमहापौर लावतात. इतकी भयाण परिस्थिती पण हिंदू जागाच होत नाही, असं शरद पोंक्षे यांनी म्हटलं आहे.
सांगली येथे हिंदू व्यवसाय बंधू आणि सर्वमंगल ग्रुपच्या वतीने आयोजित केलेल्या गृहोपयोगी वस्तू आणि साहित्य प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमात शरद पोंक्षे यांनी विविध मुद्द्यांना हात घातला. हिंदुनी हिंदूसाठीच व्यवसाय करावा असे आवाहन करताना त्यांनी काही सल्ले दिले. आपल्या घरातील फ्रीज, फॅन यांसारख्या इलेक्ट्रीक वस्तू खराब झाल्या तर दुरुस्त करण्यासाठी फक्त हिंदू टेक्निशियनच बोलवावा. अशा सेवा देणाऱ्यांचे नंबर प्रत्येक ग्रुपमध्ये शेयर करावेत. घरी लागणाऱ्या भाज्या, वस्तू या हिंदू माणसाकडेच खरेदी कराव्यात. अहिंदू माणसाकडे कोणतीही खरेदी करू नये, असे आवाहन शरद पोंक्षे यांनी यावेळी केले.
शरद पोंक्षे बोलताना पुढे म्हणाले की, काहीही असो मी भाजीपाला घ्यायला जाईल, फळे घ्यायला जाईल तेही फक्त हिंदू माणसाकडेच घेईल. हिंदूंनी फक्त हिंदूंकडून वस्तु विकत घ्याव्या हे सांगण्याचा अधिकार मला संविधानाने दिला आहे.
त्यामुळे हिंदुंनो तुमच्या घरात येणारा कार्पेंटर, प्लंबर, वायरमन. सुतार तो कोणत्याही परिस्थितीत हिंदूच असला पाहीजे. हिंदुनाच बोलवा, मग तो कितीही उर्मट असला तरी चालेल. तो उशीरा आला तरी चालेल, आज येतो सांगून चार दिवसांनी आला तरी चालेल. पण धर्मांतरण होण्यापेक्षा चार दिवस त्याची वाट पाहणं कधीही चांगलं असं आवाहन त्यांनी केलं.
ज्याने हजारो हिंदू स्त्रियांवर अत्याचार केले तसेच त्यांना गुलाम बनवले. लाखो लोकांना जबरदस्तीने मुस्लिम धर्म स्वीकारणास भाग पाडले. ज्याने हिंदूंची मंदिरं उध्वस्त केली, मुर्ती फोडल्या अशा व्यक्तीचा फोटो मालेगाव महापालिकेच्या मुस्लिम उपमहापौर महिलेने आपल्या दालनात लावला. इतकी भयाण परिस्थिती आहे, पण हिंदू जागेच व्हायला तयार नाही. म्हणून तर अशी हिंदूंची प्रदर्शनं भरवण्याची वेळ येते असंही शरद पोंक्षे म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.