Mangesh Chavan Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Chalisgaon BJP News : भाजपच्या पहिल्या दहा आमदारांमध्ये चाळीसगावचे मंगेश चव्हाण

Sampat Devgire

Girish Mahajan News : भारतीय जनता पक्षाने राज्यातील आपल्या आमदारांचे रिपोर्ट कार्ड तयार केले आहे. यामध्ये चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांची कामगिरी उल्लेखनिय असल्याचे बोलले जाते. त्यामुळे त्यांचे गिरीश महाजन यांनी कौतुक केले. (BJP Prepared a performance list of MLA in the state)

ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी चाळीसगावचे (Jalgaon) आमदार मंगेश चव्हाण (Mangesh Chavan) यांच्या कामकाजाचे कौतुक केले. ते माझ्या पावलावर पाऊल ठेऊन चाललेल असल्याचे सांगितले.

येथील आमदार मंगेश चव्हाण व शिवनेरी फाऊंडेशनतर्फे स्वर्गीय रामराव जिभाऊ पाटील विद्यार्थी सन्मान शिष्यवृत्ती योजनेंतर्गत शहरासह तालुक्यातील अनाथ व गरजू १ हजार २०० विद्यार्थ्यांना आज मोफत सायकलचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.

राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या १०५ आमदारांच्या कार्याची पुस्तिका आपल्यासमोर आली असता, धडाडीने जनतेची कामे करणाऱ्या पहिल्या दहा आमदारांमध्ये मंगेश चव्हाण यांचा समावेश आहे.

त्याबाबत महाजन यांनी त्यांचे कौतुक करताना, ते माझ्या पावलावर पाऊल टाकत काम करीत असल्याचे सांगत असले तरी मी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करीत आहे. जे मला एवढ्या वर्षांत सुचले नाही असे कार्य आमदार चव्हाण यांनी केल्याचे सांगतिले.

ते पुढे म्हणाले, आपल्या मनात इच्छाशक्ती, कर्तृत्व व जिद्द असेल तर आपण जीवनात खूप मोठे होऊ शकतो, याचे जिवंत उदाहरण जामनेर तालुक्यातील स्वर्गवासी भंवरलालजी जैन आहेत. हाच आदर्श डोळ्यांसमोर ठेवून विद्यार्थ्यांनी जीवनात यशोशिखर गाठावे.

यावेळी जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, माजी आमदार स्मिता वाघ, प्रा. साहेबराव घोडे, महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा देवयानी ठाकरे, पारोळ्याचे नगराध्यक्ष करण पवार, सावद्याचे नगराध्यक्ष राजेश वानखेडे, उद्योजक भूषण भोसले, योगेश अग्रवाल, योगाचार्य वसंतराव चंद्रात्रे, भाजपचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्‍वर महाराज जळके आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT