Manikrao Kokate Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Manikrao Kokate Politics: कृषिमंत्री कोकाटे म्हणतात, "प्रत्येक शेतकऱ्याने फाटका सदरा नव्हे कोट घालावा"

Manikrao Kokate; Agriculture Minister's strange statement: Farmers should wear coat instead torn shirt -आमदार रोहित पवार यांनी कृषिमंत्र्यांनी शेतकऱ्यांचा फाटका सदरा विसरू नये, या विधानाने डिवचले होते.

Sampat Devgire

Rohit Pawar News: कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी पुन्हा एकदा चर्चेत यावे असे विधान केले आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे एकेकाळचे शिष्य असलेले कृषिमंत्री कोकाटे नेहमी माजी मुख्यमंत्री राणे यांच्याप्रमाणेच कोट परिधान करतात. त्यावरून ताजे प्रकरण चर्चेत आहे.

राज्यात सगळीकडे अवकाळी पाऊस थैमान घालतो आहे. त्यामुळे शेतकरी प्रचंड संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासन आणि कृषी विभागाकडून कोणताही दिलासा मिळालेला नाही. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार रोहित पवार यांनी कृषिमंत्र्यांना आवाहन केले होते.

राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे करण्याचे आदेश विविध मंत्र्यांनी केले आहेत. प्रत्यक्षत मात्र कुठेही त्याची कार्यवाही होताना दिसत नाही. त्यामुळे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी त्यात लक्ष घालावे, असे आवाहन आमदार पवार यांनी केले होते.

आमदार रोहित पवार या संदर्भात म्हणाले, कृषिमंत्री कोकाटे यांनी रोज नवा कोट घालावा. मात्र असे करताना राज्यातील संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचा फाटका सदरा विसरू नये. या शेतकऱ्यांचा फाटका साजरा सध्या सगळ्यांच्या चिंतेचा विषय बनला आहे.

आमदार पवार यांच्या विधानाला कृषिमंत्री कोकाटे यांनी उत्तर दिले आहे. ते म्हणाले, मी कृषिमंत्री झालो असलो तरी त्याआधीही आणि आत्ता देखील शेतकऱ्यांना अजिबात विसरलेलो नाही. अडचणीच्या काळात राज्य सरकार आणि कृषी विभाग शेतकऱ्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहणार आहे.

मी शेतकऱ्यांना कधीही विसरलेलो नव्हतो. प्रत्येक शेतकऱ्याने फाटक्या सदऱ्यापेक्षा नेहमी कोट घालावा अशी माझी इच्छा आहे. यापूर्वीही मी कोट घालत होतो. त्यामुळे हा चर्चेचा विषय करणे योग्य वाटत नाही. या शब्दात कृषिमंत्री कोकाटे यांनी आमदार पवार यांच्या विधानाचा समाचार घेतला.

आमदार रोहित पवार हे शनिवारी नाशिकच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पुणे येथील हुंडाबळीच्या पार्श्वभूमीवर देखील आपले मतप्रदर्शन केले. संदर्भात महिला आयोग आणि त्याच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या कार्यपद्धतीवर टीका झाली होती. त्यावर महिला आयोगाचे अध्यक्ष राजकीय नसाव्यात, असे आमदार पवार म्हणाले

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT