Manikrao Kokate & Ajit Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Manikrao Kokate Politics: कृषिमंत्री कोकाटे यांच्या अडचणी कमी होईनात... आता अजित पवारांची नाराजी?

Agriculture Minister Manikrao Kokate controversy: कृषिमंत्री माणिकराव कोकाटे विविध वादग्रस्त वक्तव्यांमुळे सर्वाधिक चर्चित मंत्री आहेत.

Sampat Devgire

Maharashtra Cabinet Tension: कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांबाबत विविध वादग्रस्त वक्तव्य केली. त्यामुळे ते सर्वाधिक चर्चेत असलेले मंत्री ठरले आहेत. या वक्तव्यांचा फटका महायुती सरकारला देखील सहन करावा लागला.

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांसंदर्भात विविध वादग्रस्त वक्तव्य केली. त्यामुळे माध्यमांतून त्यांच्यावर टीकेची झोड उठविण्यात आली. या पार्श्वभूमीवर कृषिमंत्री कोकाटे सध्या बचावात्मक स्थितीत आहेत. निकटवर्तीयांनी ही प्रतिमा बदलण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

माणिकराव कोकाटे हे मंत्रिमंडळातील सर्वाधिक चर्चेतील नाव आहे मात्र त्याचे कारण त्यांनी केलेली वादग्रस्त वक्तव्य आहेत या वक्तव्यामुळे आधीच अडचणीत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषिमंत्री कोकाटे यांच्यात दुरावा निर्माण झाल्याचे समजते.

कृषिमंत्री कोकाटे यांनी आपल्या स्वभावानुसार सहजपणे काही वक्तव्य केली होती. मात्र त्या वक्तव्यातून वेगळेच सूर निघाले. त्यामुळे माध्यमे आणि शेतकऱ्यांची संबंधित विविध संघटनांनी ही कोकाटे यांचा चांगलाच समाचार घेतला. काही संघटनांनी कोकाटे यांचा निषेध देखील केला.

या संदर्भात भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोकाटे यांच्या वक्तव्यामुळे माफी मागितली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही कोकाटे यांच्या वक्तव्यावरून त्यांची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे महायुती सरकारला कोकाटे यांच्या वादग्रस्त वक्तव्यांचा फटका बसला. या सगळ्यांचा परिणाम म्हणून म्हणजे उपमुख्यमंत्री पवार यांनी कोकाटे यांना सूचक शब्दात इशारा दिला आहे.

सगळ्यांचा परिणाम म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषिमंत्री कोकाटे यांच्यात दुरावा निर्माण झाला आहे. त्यामुळे कृषिमंत्री कोकाटे हे देखील चिंतेत आहेत. कोकाटे यांच्या निकटवर्ती यांनी ही प्रतिमा सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी माध्यमांच्या प्रतिनिधींशीही चर्चा झाल्याचे बोलले जाते.

एकंदरच माणिकराव कोकाटे यांनी गेल्या महिन्याभरात केलेल्या विविध वक्तव्यांमुळे ते अडचणीत आहेत. या अडचणी त्यांचा पिच्छा सोडायला तयार नाहीत. त्यामुळे कोकाटे हे नेहमीप्रमाणे काम कमी आणि वाद अधिक या गोंधळात अडकले आहे.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये Number One डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातील नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT