Radhakrishna Vikhe : मोठी बातमी, विखे-थोरात 'सहमती एक्स्प्रेस'? कारखान्यांच्या बिनविरोध निवडणुकांवर मंत्री विखेंकडून शिक्कामोर्तब?

BJP Minister Radhakrishna Vikhe Patil Shirdi unopposed elections Sangamner Thorat Pravara Vikhe cooperative sugar factories : शिर्डी इथं भाजप मंत्री राधाकृष्ण विखे यांनी थोरात अन् विखे सहकारी कारखान्याच्या निवडणुकीवर मोठं भाष्य केलं आहे.
Radhakrishna Vikhe 3
Radhakrishna Vikhe 3Sarkarnama
Published on
Updated on

Shirdi Maharashtra political news : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपासून, अहिल्यानगर जिल्ह्यात भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा राजकीय संघर्ष तीव्र आहे. लोकसभा निवडणुकीत सुजय विखे यांचा पराभव झाल्यापासून मंत्री विखे चांगलेच आक्रमक आहेत. या पराभवाचा वचपा विखेंनी विधानसभेत थोरातांचा पराभव करून घेतला.

आता हा राजकीय संघर्ष पुन्हा सहकार कारखान्यांच्या निवडणुकीच्या निमित्ताने उफळणार असेच गेल्या काही दिवसांपासून संकेत मिळत होती. पण, शिर्डी इथं भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या निवडणूक लढवण्यावर मोठी प्रतिक्रिया दिली.

संगमनेर इथं सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याची आणि प्रवरा इथल्या पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी पुढील महिन्यात मे 2025 मध्ये मतदान होणार आहे. थोरातांनी सहकार कारखान्यासाठी कोणतीही दगाबाजी नको म्हणून, गेल्या काही दिवसांपासून मतदारसंघात मोठी साखर पेरणी केली आहे. मात्र शिवसेनेचे (Shivsena) आमदार अमोल खताळ यांनी त्यांना कोणत्याही परिस्थितीत कारखाना काबिज करायचाच, असे म्हणत शड्डू ठोकला आहे.

Radhakrishna Vikhe 3
Mallikarjun Kharge BJP voter fraud allegation : खरगेंनी मतदार घोटाळ्यांवरून भाजपला पुन्हा डिवचलं; मंत्री विखेंनी काँग्रेसच्या वर्मावरच घाव घातला

विखे कारखान्यासाठी मंत्री विखे (Radhakrishna Vikhe) विरोधकांनी एकत्रित येत मोट बांधणीला सुरुवात केली आहे. दिग्गज नेत्यांच्या ताब्यात असलेल्या कारखान्याची निवडणूक असल्याने, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमधील कडवट झुंजीनंतर, या कारखान्यांची निवडणूक गाजणार असेच चित्र होते. परंतु शिर्डीत भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी कारखान्याच्या निवडणुकीबाबत मोठं विधान केलं आहे.

Radhakrishna Vikhe 3
Shrirampur corruption protest : मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर नोटांचं 'तोरण' बांधलं; अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट कारभारावर 'आझाद'नं बोट ठेवलं

विधानसभा निवडणुकीनंतर विखे आणि थोरात यांच्यातील राजकीय संघर्ष शिगेला पोचलेला असताना, सहकारी साखर कारखाना निवडणुकीत मात्र वेगळेच चित्र बघायला मिळत आहे. प्रवरा आणि थोरात कारखान्याच्या निवडणुका एकमेकांविरोधात न लढण्याचा निर्णय दोन्ही नेत्यांनी घेतल्यांचं समोर येत आहे. सहकारात अलिखित करार असल्याचे सांगत, मंत्री विखे पाटलांनी निवडणुका बिनविरोध झाल्यावर शिक्कामोर्तब केल आहे.

एकमेकांचे राजकीय विरोधक असलेल्या विखे आणि थोरात यांच्यातील राजकीय संघर्ष साखर कारखाना निवडणुकीत पुन्हा बघायला मिळणार, अशी चर्चा होती. मात्र थोरातांची सत्ता असलेल्या संगमनेर कारखाना निवडणुकीत विखे पाटील यांच्या समर्थकांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. तर विखे पाटील यांची सत्ता असलेल्या प्रवरा कारखाना निवडणुकीतही थोरात समर्थकांनी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी एकही अर्ज दाखल न केल्याने दोन्ही साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध होणार, असल्याचं चित्र आहे.

सहकाराच्या निवडणुकीत एकमेकांविरोधात लढायचं नाही असा अलिखित करार आम्ही पाळत असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मात्र पूर्ण ताकदीने लढवणार असल्याचं मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे. तर केवळ व्यक्तीला विरोध करण्यासाठी निवडणूक लढवायची हा सहकार नाही. भविष्यात शेतकऱ्यांचे हित नसेल तिथे आम्ही आवाज उठवत राहू, अशी प्रतिक्रिया माजी खासदार सुजय विखे यांनी दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com