Manikrao Kokate Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Manikrao koKate Politics: आमदार माणिकराव कोकाटे कोट्याधीश, पत्नी त्यांच्याहूनही अधिक श्रीमंत!

Manikrao Kokate; MLA kokate billionaire, wife Seema more rich than Manikrao-सिन्नर विधानसभा मतदारसंघातील आमदार माणिकराव कोकाटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करतांना संपत्तीचे विवरण दिले आहे.

Sampat Devgire

Manikrao kokate: सिन्नर विधानसभा मतदारसंघातून आमदार माणिकराव कोकाटे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या अर्जासोबत त्यांनी आपल्या संपत्तीचे विवरणपत्र देखील सादर केले आहे. आमदार कोकाटे यांच्या संपत्तीत वाढ झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षातर्फे सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी उमेदवारी अर्ज दाकल केला. ते कोट्याधीश आहेत. त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातील माहितीनुसार मावळत्या वर्षात सादर केलेल्या प्राप्तिकर विभागाच्या विवरणपत्रानुसार त्यांचे वार्षिक उत्पन्न ४०.७५लाख आहे.

त्यांच्या पत्नी सौ. सीमाताई कोकाटे यांचे उत्पन्न २२.६२ लाख होते. आमदार कोकाटे यांच्याकडे १३.५८ लाख रुपये आणि त्यांच्या पत्नीकडे १७.७७ लाख रोख आहेत. आमदार कोकाटे यांच्या विविध बँकांमधील खात्यात ९.५७ लाख रुपये आहेत.

सौ. कोकाटे यांची देखील विविध बँकांत खाती आहेत. या खात्यांमध्ये २७.१७ लाख रुपयांच्या ठेवी आहेत. गुंतवणुकीच्या बाबतीत आमदार कोकाटे यांची गुंतवणूक २६.५६ लाख रुपये आहे.

विशेष म्हणजे सौ. कोकाटे याबाबती आमदार माणिकराव कोकाटे यांच्यापेक्षाही पुढे आहेत. त्यांनी आठ प्रकारच्या म्युच्युअल फंडांत मोठी गुंतवणूक केली आहे. सौ कोकाटे यांची विविध म्युच्युअल फंड, शेअर्स आणि अन्य विमा संस्थांमध्ये ४.२८ कोटी रुपयां रुपयांची गुंतवणूक करण्यात आलेली आहे.

आमदार कोकाटे यांच्याकडे एक किलो १००ग्रॅम आणि त्यांच्या पत्नीकडे दोन किलो सोने आहे. या सगळ्या सोन्याचे मूल्य २.३२ कोटी रुपये आहे. सोने, चांदी अथवा अन्य आभूषणांच्या माहितीत बदल झालेला नाही.

या दोघांनाही विविध संस्थांची कर्ज आणि अन्य माध्यमातून अदा करावयाची देणे अनुक्रमे २.९० कोटी आणि ४.८५ कोटी रुपये आहे. यामध्ये प्रामुख्याने सहकारी संस्थांचे कर्ज आहे. सिन्नर येथील सहकारी प्रक्रीया संस्थेसाठी त्यांनी अर्थसाह्य केले आहे.

आमदार कोकाटे यांची मुंबईत सिंधुदुर्ग सोसायटीमध्ये सदनिका आहे. याशिवाय नाशिक, सिन्नर, सोमठाणे, सिन्नर, विसे मळा आदी ठिकाणी घरे आहेत. धरणगाव (निफाड), ओढा (नाशिक), घोरवड (सिन्नर), शिलापूर (नाशिक), सोमठाणे, हरसुले, ओढा आणि मालेगाव येथे त्यांच्या जमिनी आहेत.

त्यांच्याकडे एक पेट्रोल पंप देखील आहे. या पेट्रोल पंपात त्यांची गुंतवणूक आहे. एकंदर आमदार कोकाटे यांची संपत्ती ८.१३ कोटी तर त्यांच्या पत्नी सीमाताई यांची संपत्ती ९.८६ कोटी रुपये आहे.

संपत्ती आणि गुंतवणूक या दोन्हींच्या दृष्टीने सीमाताई कोकाटे या आमदार कोकाटे यांच्या पेक्षाही श्रीमंत आहेत. त्यांच्या विविध म्युच्युअल फंड्स मध्ये मोठ्या गुंतवणूक आहेत. या दोघांकडेही आयुर्विमा महामंडळाची प्रत्येकी ५० लाख रुपयांची पॉलिसी आहे. २०१९ मध्ये त्यांनी सादर केलेल्या संपत्तीच्या विवरणाच्या तुलनेत त्यांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली आहे.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT