Chhagan Bhujbal Politics: मंत्री छगन भुजबळ यांची मालमत्ता जैसे थे, कुटुंबातील `या` सदस्याकडून घेतले कर्ज!

Chhagan Bhujbal Property Status: मंत्री छगन भुजबळ यांनी उमेदवारी अर्जासोबत आपल्या मालमत्तेचे विवरण सादर केले आहे.
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Assembly Elections: राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी येवला मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मंत्री भुजबळ यांनी उमेदवारी अर्ज सोबत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विविध प्रतिज्ञापत्र दाखल केली आहेत.

मंत्री भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञा पत्रानुसार गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा त्यांच्या मालमत्तेत किंचित वाढ झाली आहे.

विशेषतः २०१४ मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी २१.७५ कोटी रुपयांची मालमत्ता असल्याचे जाहीर केले होते. २०१४ मध्ये २००९ च्या तुलनेत ही संपत्ती ७.७५ कोटींवरून २१ कोटींवर गेली होती. त्या तुलनेत यंदा त्यांच्या संपत्तीत किंचित वाढ झाली आहे.

मंत्री भुजबळ यांचे सिडको (नाशिक) येथे भुजबळ फार्म, मुंबईत वरळीला सुखदा सोसायटीमध्ये सदनिका, माझगाव (मुंबई) येथे एक सदनिका यांसह विविध मालमत्ता आहेत. याशिवाय त्यांच्याकडे इंदोरे (दिंडोरी) आणि नाशिक येथे शेती आहे.

Chhagan Bhujbal
Maharashtra Assembly Elections : अजितदादा भाजपला भारी भरले; जागा राखल्या, तर 'मविआ'ला चेहरा शोधायला लावलं

प्राप्तिकर विभागाला सादर केलेल्या विवरणपत्रात २०१९ मध्ये त्यांचे वार्षिक उत्पन्न २६.५६ लाख तर यंदा मावळत्या वर्षात ३९.४६ लाख रुपये दाखविण्यात आले आहे. त्यांच्याकडे ८५ हजार दोनशे आणि पत्नी सौ मीनाताई भुजबळ यांच्याकडे चौदा हजार ४७० रुपये रोख आहेत. या दोघांचेही विविध बँकात ५६ लाख रुपयांच्या ठेवी आहेत.

मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे ५८५ ग्राम सोने आहे. पत्नी मीनाताई यांच्याकडे ४५५ ग्राम सोने, पाच किलो चांदी व अन्य आभूषणे आहेत. त्यांचे एकत्रित मूल्य ५९ लाख रुपये आहे. विशेष म्हणजे मंत्री भुजबळ यांनी आपला मुलगा आमदार पंकज भुजबळ यांच्याकडून कर्ज घेतले आहे. पत्नी मीनाताई यांनी देखील कुटुंबातील सदस्यांकडून कर्ज घेतले आहे.

मंत्री भुजबळ आणि त्यांच्या पत्नी सौ मीनाताई या दोघांच्याकडेही गेल्या पाच वर्षात सोन्यामध्ये व चल संपत्तीत जवळपास काहीही वाढ झालेली नाही.

Chhagan Bhujbal
Sameer Bhujbal Politics: माजी खासदार समीर भुजबळ नांदगावचे सर्वात श्रीमंत उमेदवार, एवढी आहे मालमत्ता...

मंत्री भुजबळ यांच्यावर प्राप्तिकर विभागाच्या खटल्यात या विभागाकडे मंत्री भुजबळ यांच्या काही मालमत्ता ताब्यात आहेत. सक्त वसुली संचालनालय (इडी) आणि नाचलुचवत प्रतिबंधक विभागाचा एक खटला प्रलंबित आहे. याशिवाय यांच्यावर पोलिसात देखील काही खटले प्रलंबित आहेत.

मंत्री भुजबळ यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडील एकूण मालमत्तेत सोने व अन्य ठेवी यामध्ये १.३२ कोटी, शेती ४.४४कोटी आणि अन्य मालमत्ता ११.२० कोटी आहे. त्यात फारशी वाढ झालेली नाही. त्यांच्या पत्नीच्या मालमत्तेत देखील विशेष वाढ नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com