Manikrao Kokate Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Manikrao Kokate : राजीनामा देण्यासारखं घडलं काय? मी काय कुणाचा विनयभंग केला का? कोकाटे भडकले

Agriculture Minister Manikrao Kokate : कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून होत आहे. याप्रकरणावर आता कोकाटे यांनी पत्रकारपरिषद घेत स्पष्टीकरण दिलं आहे. मला रमी खेळता येत नाही असं ते म्हणालेत.

Ganesh Sonawane

Manikrao Kokate : सभागृहात पावसाळी अधिवेशन सुरु असताना रमी गेम खेळतानाचा कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून होत आहे. याप्रकरणावर आता कोकाटे यांनी पत्रकारपरिषद घेत स्पष्टीकरण दिलं आहे.

विरोधक तुमच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचे आपल्याला फोन आल्याची चर्चा आहे...असं पत्रकारांनी विचारलं असता कोकाटे म्हणाले..राजीनामा देण्यासारखं घडलं काय ते आधी सांगा. मी काय कुणाचा विनयभंग केला...कुठे चोरी केली किंवा शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय घेतला आहे का? की माझी गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. राजीनामा देण्यासारखं काय झालय काय असं? एक व्हिडीओ फक्त विरोधकांनी रेकॉर्ड केला आहे. त्या व्हिडीओमुळे माझी विनाकारण बदनामी झाली. ज्यांनी बदनामी केली त्यांना मी कोर्टात खेचणार आहे. अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहे असा इशारा कोकाटे यांनी दिला.

कोकाटे म्हणाले, मी रम्मी खेळलेलो नाही. मला रमी खेळताच येत नाही. याप्रकरणात आपली बदनामी केली गेल्याचा आरोप कोकाटे यांनी यावेळी केला. बदनामी करणाऱ्यांना कोर्टात खेचणार आहे. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्यासाठी आपण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष यांना पत्र देणार असल्याचे त्यांनी सांगितलं. या प्रकरणाची सखोल चौकशी त्यांनी करावी जर चौकशीत तो व्हिडीओ खरा निघाला तर मी स्वत: राजीनामा देईल असं कोकाटे म्हणाले.

खरं म्हणजे हा फार छोटा विषय आहे. हा विषय इतका का लांबला हे मला समजत नाही. जंगली रमी हा विषय तुम्हाला माहित नाही का? मला रमी खेळता येत नाही. ऑनलाइन रमी खेळण्यासाठी त्याला मोबाईल नंबर जॉइन करावा लागतो. तुमचं बॅंक अकाउंटही त्याला जोडावं लागतं. त्याशिवाय तुम्हाला ऑनलाइन रमी खेळता येत नाही. माझा मोबाईल नंबर व बॅंक अकाउंट ऑनलाइन रमीशी संलग्न नाही. हा गेम सुरु झाल्यापासून आजतागायत मी एक रुपयाची रमी खेळलो नाही. मला रमी खेळताच येत नाही. हे सर्व आरोप खोटे आहेत, बिनबुडाचे आरोप आहेत. असं कोकाटे म्हणाले.

दरम्यान कोकाटे यांच्या व्हिडीओवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रमी खेळतानाचे दृश्य भूषणावह नाही. सभागृहात गांभीर्याने उपस्थित असणे गरजेचे असते असं म्हणत नाराजी व्यक्त केली. त्यावर विचारले असता कोकाटे म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी दिलेली प्रतिक्रिया मीडीयावरती विश्वास ठेवून दिलेली आहे. पण तसं कोणतही काम मी केलं नाही. रमी मी खेळलो नाही. खेळणं बरोबर नाही. मी पंचवीस वर्षांपासून विधानसभेत आहे. विधानसभेचे कायदे, नियम मला समजतात. विधानसभेत व विधानपरिषदेत काय करावं काय करु नये या नियमांची मला काळजी आहे. पंचवीस वर्षांपासून मी ते नियम पाळत आलो आहे आणि आत्ताही पाळलेले आहे. जाहीरात स्कीप करेपर्यंतचा फक्त त्या दहा बारा सेकंदाचा विषय आहे. अनावश्यक तो विषय लावून धरला जात आहे असं कोकाटे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT