Nashik News : राज्याचे कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माणिकराव कोकाटे यांनी बनावट कागदपत्रे सादर करून मुख्यमंत्री कोट्यातील सदनिका घेतली होती.न्यायालयानं 1995 मधील याप्रकरणी निकाल देतानाच कृषिमंत्री कोकाटे यांना दोन वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आहे.या प्रकरणी मंत्री कोकाटे यांनी त्यांना सुनावण्यात आलेल्या शिक्षेप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालय शनिवारी (ता.1 मार्च) अंतिम निकाल देण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकाटेंची आमदारकी व मंत्रिपद जाणार की राहणार याचा निकाल थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे.
कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेला स्थगिती मिळण्यासाठी कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंनी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात अपील केले होते.याच अपिलावरील सुनावणी पार पडल्यानंतर न्यायालयाचा थोड्याच वेळात निकाल जाहीर करणार आहे.कोकाटेंना बनावट कागदपत्र आणि फसवणूक प्रकरणी शिक्षा झाली आहे.
एकीकडे राज्यात बीड हत्येप्रकरणी आधीच महायुती सरकारमधील अन्न व नागरी पुरवठा मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप होत आहेत.अशातच राष्ट्रवादीचे दुसरे नेते माणिकराव कोकाटे(Manikrao Kokate) हेही अडचणीत आल्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह महायुती सरकारची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे.
एकीकडे राज्यात बीड हत्येप्रकरणी आधीच महायुती सरकारमधील अन्न व नागरी पुरवठा मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडेंवर (Dhananjay Munde) गंभीर आरोप होत आहेत.अशातच राष्ट्रवादीचे दुसरे नेते माणिकराव कोकाटे हेही अडचणीत आल्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह महायुती सरकारची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे.
याबाबतच्या लोकप्रतिनिधी कायद्यातील तरतुदीनुसार कोकाटे यांना शिक्षेवरील स्थगिती मिळणे अपेक्षित आहे.तसे न झाल्यास कृषी मंत्री कोकाटे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष दोघेही अडचणीत येण्याची शक्यता आहे. महायुतीच्या सरकारच्या मंत्रिमंडळात शिक्षा झालेले कोकाटे हे पहिलेच मंत्री आहेत. त्यामुळे महायुती पुढे राजकीय पेच वाढण्याची शक्यता आहे. विरोधकांकडून या संधीचा लाभ उठविण्यासाठी मंत्री कोकाटे यांच्यावर कारवाईची मागणी होत आहे.
दरम्यान, या संदर्भात मूळ तक्रारदार आणि माजी राज्यमंत्री (कै) तुकाराम दिघोळे यांच्या कन्या अंजली राठोड यांनी कृषिमंत्री कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देऊ नये, असा अर्ज दिला होता. मात्र न्यायालयाने तो अर्ज फेटाळला. या निमित्ताने सिन्नर तालुक्याच्या राजकारणातील दिघोळे विरुद्ध कोकाटे हा वाद पुन्हा एकदा पुढे आला आहे
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. या शिक्षेविरोधात कोकाटे यांनी सोमवारी वरिष्ठ न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयाने त्यांना सुनावणी पूर्ण होईपर्यंत जामीन मंजूर केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.