
Karad News : महायुतीमधील तीनही पक्षाकडून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोळयासमोर ठेवून वक्तव्य केली जात आहेत. तीनही पक्षाकडून स्वबळावर लढण्याचे संकेत दिले जात असल्याने राज्यातील वातावरण चांगलेच तापले असतानाच आता या वादावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पडदाच टाकला आहे.
पक्ष वाढवण्यासाठी नेत्यांना कार्यकर्त्यांसमोर काही भूमिका मांडाव्या लागतात. काहीही असले तरी आम्ही तीन पक्ष महायुती म्हणूनच लढणार आहोत. ज्याठिकाणी भाजप लढतेय तेथे शिवसेना, राष्ट्रवादीची मदत घेण्यात येईल. जेथे ते दोन्ही पक्ष लढतील तेथे आम्ही मदत करु, अशी स्पष्टोक्ती भाजपचे (Bjp) प्रदेशाध्यक्ष महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एकनाथ शिंदे यांच्या पुण्यात भगवा फडकवणार आणि अजित पवार यांच्या तिरंगा फडकवणार या वक्तव्यावर करत त्यावर पडदाच पाडला.
पुण्याची सत्ता ताब्यात घेण्यासाठी उपमुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांनी पुण्यात भगवा फडकवणार आणि उपमुख्यमंत्री पवार यांनी पुण्यात तिरंगा फडकवणार अशी वक्तव्य केली होती. त्यावर मंत्री बावनकुळे बोलत होते. आमदार अतुल भोसले, भाजपचे महासचिव आमदार विक्रांत पाटील, सरचिटणीस अनुप पांडे, प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे, भाजपचे सरचिटणीस रामकृष्ण वेताळ, भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सुदर्शन पाटसकर आदी उपस्थित होते.
पक्ष वाढवण्यासाठी नेत्यांना कार्यकर्त्यांसमोर काही भूमिका मांडाव्या लागतात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आम्ही भाजप म्हणून दीड कोटी सदस्य संख्या असलेला भाजप पक्ष करतोय. काहीही असले तरी आम्ही तीन पक्ष महायुती म्हणूनच लढणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यापुढील काळात सगळीकडे महायुतीचा कब्जा असणार आहे. ज्याठिकाणी आम्ही लढतोय तेथे शिवसेना राष्ट्रवादीची मदत घेणार आहोत, ज्याठिकाणी ते लढतील तेथे आम्ही मदत करु, असेही मंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.