krushna Andhale : फरार कृष्णा आंधळे सीआयडीच्या चार्टशीटमध्ये कितव्या क्रमांकाचा आरोपी, दोघांचा तर उल्लेखही नाही!

Santosh Deshmukh Murder Case krushna Andhale CID Chargesheet : सीआयडीने चार्टशीट दाखल करताना वाल्मिक कराड याचा उल्लेख आरोपी क्रमांक एक असा वाल्मिक कराडचा उल्लेख केला आहे. तर, विष्णू चाटे याचा उल्लेख आरोपी क्रमांक दोन केला आहे.
Santosh Deshmukh-Krishna Andhale
Santosh Deshmukh-Krishna AndhaleSarkarnama
Published on
Updated on

krushna Andhale News : संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीने विशेष मोक्का न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. फक्त खंडणीच्या गुन्ह्यासाठी अटक करण्यात आलेला वाल्मिक कराड हाच या हत्येतील मुख्य सुत्रधार असल्याचा उल्लेख दोषारोपपत्रात करण्यात आला असून वाल्मिक कराड याचा उल्लेख आरोपी क्रमांक एक असा करण्यात आला आहे.

संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 ला अपहरण करत हत्या करण्यात आली. या हत्येला जवळपास तीन महिने झाले या प्रकरणात सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर, एक आरोपी कृष्णा आंधळे हा अद्यापही फरार आहे. त्याचा देखील हत्येत सहभाग असल्याचे चार्टशीटमध्ये म्हटले आहे.

Santosh Deshmukh-Krishna Andhale
Satej Patil : महायुतीला धक्का! काँग्रेसच्या सतेज पाटलांनी दोन मंत्री, दोन आमदार लावले गळाला

सीआयडीने चार्टशीट दाखल करताना वाल्मिक कराड याचा उल्लेख आरोपी क्रमांक एक असा वाल्मिक कराडचा उल्लेख केला आहे. तर, विष्णू चाटे याचा उल्लेख आरोपी क्रमांक दोन केला आहे. हत्येमध्ये सहभागी असलेल्या आणि संतोष देशमुख यांना मारहणा करणाऱ्या सुदर्शन घुले आणि प्रतीक घुले यांचा उल्लेख आरोपी क्रमांक तीन आणि आरोपी क्रमांक चार असा करण्यात आला आहे.

मागील तीन महिन्यांपासून फरार असलेल्या कृष्णा आंधळेचा उल्लेख आरोपी क्रमांक आठ म्हणून करण्यात आला आहे. तर सुधीर सांगळे,महेश केदार,जयराम चाटे यांचा उल्लेख अनुक्रमे आरोपी क्रमांक पाच, सहा आणि सात असा करण्यात आला आहे.

आरोपीमध्ये 'त्या' दोघांची नावे नाहीत

खंडणी, ॲट्रॉसिटी, हत्या या तिन्ही घटनांचा दोषारोपत्रात एकत्रित उल्लेख करण्यात आला आहे. मात्र, आरोपींना मदत करण्याचा संशय असलेला रणजीत मुळे, सिद्धार्थ सोनावणे यांच्या विरोधात पुरावे न मिळाल्याने या दोघांचे दोषारोपपत्रात नाव नाही.

Santosh Deshmukh-Krishna Andhale
Uddhav thackeray : 'आता उद्धव ठाकरेंना उद्ध्वस्त करणार'; शिवसेनेच्या बड्या नेत्याचा इशारा

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com