NCP Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

NCP MLA : राष्ट्रवादीच्या 'या' नेत्याची आमदारकी जाणार? 6 महिन्यात फैसला होणार

Manikrao Kokate case : न्यायालयाने दोषी ठरविल्याने कृषिमंत्री असलेल्या कोकाटे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यामुळे या निकाला विरोधात कोकाटे यांनी मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल केले. त्यात कोकाटे यांच्या शिक्षेच्या अंमलबजावणीला सहा महिने स्थगिती देण्यात आली.

Sampat Devgire

Nashik News, 05 Aug : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे त्यांच्यावर आमदारकी रद्द होण्याची टांगती तलवार आहे. या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात खटला सुरू आहे.

यू एल सी शासकीय योजनेतील गरिबांसाठी राखीव सदनिका आमदार माणिकराव कोकाटे यांनी घेतली होती. त्यासाठी ते आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांनी बनावट कागदपत्र दाखल केले. त्यामुळे आमदार कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने दोषी ठरविले होते.

न्यायालयाने दोषी ठरविल्याने कृषिमंत्री असलेल्या कोकाटे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यामुळे या निकाला विरोधात कोकाटे यांनी मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल केले. त्यात कोकाटे यांच्या शिक्षेच्या अंमलबजावणीला सहा महिने स्थगिती देण्यात आली. त्यामुळे कोकाटे यांचे विधिमंडळ सदस्यत्व वाचले.

या संदर्भात उच्च न्यायालयाची शिक्षेला स्थगिती मुदत ऑगस्ट महिन्यात संपुष्टात येणार होती. उच्च न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यातून दिलासा मिळण्यासाठी कोकाटे यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर मंगळवारी सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती व्ही मोहना आणि जॉय मल्ल्या बागची यांच्या पीठासमोर सुनावणी झाली.

यावेळी सर्वोच्च न्यायालयाने कोकाटे यांच्या उच्च न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याची सुनावणी सहा महिन्यात पूर्ण करण्याच्या सूचना केल्या. ऑफिस ऑफ प्रॉफिट या संदर्भात कोणताही निर्णय दिला नाही. त्यामुळे आता माणिकराव कोकाटे यांच्या आमदारकीचे भवितव्य आगामी सहा महिन्यात निश्चित होईल.

आमदार कोकाटे यांनी शासकीय सदनिका घेताना बनावट कागदपत्र दाखल केले. त्यामुळे त्यांच्या विरोधात कारवाई व्हावी यासाठी दिवंगत राज्यमंत्री तुकाराम दिघोळे यांनी याचिका दाखल केली होती. त्यांच्या याचिकेवर नाशिकच्या जिल्हा न्यायालयाने कोकाटे यांना दोषी ठरविले. दिघोळे यांच्या कन्या ही याचिका पुढे चालवीत आहेत. सिन्नर तालुक्यातील एक गट कोकाटे यांच्या याचिकेबाबत पडद्यामागून सूत्रे हलवत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT