Manikrao Kokate Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या 'लाल दिव्यासाठी' सुप्रीम कोर्टाचा रेड सिग्नल : मंत्रिपदासाठीची धडपड थांबवावीच लागणार

Manikrao Kokate, Supreme Court verdict : माणिकराव कोकाटे यांना बनावट सदनिका घोटाळा प्रकरणात जिल्हा न्यायालयाने दोषी ठरवल्याने व शिक्षा कायम ठेवल्याने क्रीडा मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

Ganesh Sonawane

Maharashtra Politics : राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर मुख्यमंत्री कोट्यातील सदनिका बेकायदेशीरपणे, कमी उत्पन्नाचे बनावट कागदपत्रे सादर करुन लाटल्याचा आरोप आहे. या प्रकरणात नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले होते. त्यांची दोन वर्षांची शिक्षा कायम ठेवली होती. त्या निर्णयाविरोधात कोकाटे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत अंतरिम जामीन मिळवला होता. जामिनाची मुदत संपत आल्याने पुढील जामिनासाठी केलेल्या अर्जावर आज सुनावणी होणार होती. ही सुनावणी आता एक आठवडा पुढे ढकलण्यात आली आहे.

न्यायालयाने दोषी ठरवल्याच्या पार्श्वभूमीवर कोकाटे यांनी आपल्या क्रीडामंत्री पदाचा राजीनामा दिला होता. कोकाटे यांनी दरम्यान मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती मात्र तिथेही त्यांना दिलासा मिळाला नव्हता. दरम्यान त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं होतं. मात्र प्रकृती अस्वस्थ झाल्याच्या कारणास्तव ते रुग्णालयात अॅडमिट झाले होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असताना सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिल्याने त्यांची अटक टळली होती व आमदारकी कायम राहिली.

सर्वोच्च न्यायालयाने आज सुनावणी पुढे ढकलली असली तरी कोकाटे यांना मंत्रिपद किंवा कोणतेही लाभाचे पद स्विकारण्यापासून मनाई करण्यात आली आहे. माणिकराव कोकाटे यांनी सुनावणी पुढे ढकलण्यासाठी विनंती केली होती. सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी एक आठवडा पुढे ढकलली आहे. मात्र मंत्रिपद स्विकारण्यास कोकाटे यांना मनाई करण्यात आल्याने मंत्रिपदासाठीची धडपड त्यांना आता थांबवावीच लागणार आहे.

एक आठवड्यानंतर सर्वोच्च न्यायालयात पुन्हा एकदा याच प्रकरणात सुनावणी होणार आहे. माणिकराव कोकाटे यांना सदनिका घोटाळा प्रकरणात सुनावण्यात आलेल्या शिक्षेमुळे त्यांचे मंत्रिपद घेलेच शिवाय आमदारकी सुद्दा धोक्यात आली होती. मागच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने कोकाटे यांना आमदारकीसाठी संरक्षण दिलं. परंतु मंत्रीपद किंवा कोणतेही लाभाचे पद स्वीकारण्यापासून कोकाटेंना मनाई कायम ठेवली आहे.

माणिकराव कोकाटे यांनी शिक्षेला स्थगिती मिळावी यासाठी सर्वोच्च न्यायालयात अर्ज करण्यात आला. आज सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यासमोर सुनावणी अपेक्षित होती. ती आज एक आठवडा पुढे ढकलण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT