Narhari Zirwal : लाचखोर राजेंद्र ढेरिंगेच्या घरावर एसीबीची धाड, महत्त्वाची कागदपत्रे हाती? मंत्री झिरवाळांच्या हालचाली वाढल्या

Narhari Zirwal Bribery Case : मंत्रालय लाचप्रकरणात महत्वाची अपडेट समोर आली असून लाचखोर राजेंद्र ढेरिंगेच्या नाशिकमधील घरावर ACB ने धाड टाकली असून महत्वाची कागदपत्रे हाती लागल्याची माहिती आहे.
Narhari Zirwal, Sunetra Pawar
Narhari Zirwal, Sunetra PawarSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics : राष्ट्रवादीचे नेते व अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयात एसीबीने छापा टाकला होता. मंत्री झिरवाळ यांच्या कार्यालयातील लिपीक राजेंद्र ढेरंगे याला ३५ हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले होते. या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती.

मेडीकल दुकानाचा परवाना रद्द करण्याची कारवाई टाळण्यासाठी थेट अन्न व औषध प्रशासन खात्याचे मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयातच लाच घेतल्याचा प्रकार झाल्याने विरोधकांकडून थेट झिरवाळ यांच्याच राजीनाम्याची मागणी होत आहे. मंत्र्यांचा खासगी सचिव रामदास गाडे यांच्या सांगण्यावरुन आपण लाच स्विकारल्याचा दावा राजेंद्र ढेरिंगे यांनी केल्याचे सांगितले जात आहे.

या सगळ्या प्रकरणानंतर लाच घेणारा कर्मचारी राजेंद्र ढेरिंगे याच्या विरोधात केवळ चौकशीच नव्हे तर त्यांची प्रतिनियुक्ती रद्द करण्याचे निर्देशही मंत्री झिरवाळ यांनी दिले आहेत. दरम्यान लाचखोर राजेंद्र ढेरिंगे यांना सोमवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्यापूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ( एसीबीने )राजेंद्र ढेरिंगे यांच्या नाशिक येथील (नाशिकरोड) घराची झडती घेतली. या झडतीतून एसीबीच्या हाती काही महत्त्वाची कागदपत्रे हाती लागली आहेत. त्यामुळे आता या प्रकरणात आणखी काय नवीन माहिती समोर येते हे पाहावे लागणार आहे.

Narhari Zirwal, Sunetra Pawar
Tipu Sultan Controversy : दालनात टीपू सुलतानचा फोटो पुन्हा लावणार, मालेगावच्या उपमहापौर शान-ए-हिंद यांच्या वक्तव्याने राजकीय स्फोट

राजेंद्र ढेरिंगे हे मूळ अन्न व नागरी पुरवठा विभागातील कर्मचारी आहे. वर्षभरापूर्वी अन्न व औषध प्रशासन विभागात ते प्रतिनियुक्तीवर आले. ते मंत्र्यांच्या अपील विभागात कार्यरत असल्याची माहिती आहे. दरम्यान, आता राजेंद्र ढेरिंगेच्या घराची झडती घेतली असता त्यांच्या घरातून एसीबीच्या हाती जी कागदपत्रे लागली ती कागदपत्रं न्यायालयासमोर सादर केली जाण्याची शक्यता आहे. या कागदपत्रांच्या माध्यमातून राजेंद्र ढेरिंगे याच्या लाचखोरीचे धागेदोरे कुठपर्यंत आहेत याचा सुगावा लागणार का हेही पाहावे लागेल.

Narhari Zirwal, Sunetra Pawar
Narhari Zirwal : धक्कादायक ! मंत्री नरहरी झिरवाळ यांचे मंत्रालयातील कार्यालय सील, अडचणी वाढण्याची चिन्हे; नेमकं काय झालं?

दरम्यान, या सगळ्या घडामोडी पाहात मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याही हालचाली गतिमान झाल्याचे कळत आहे. झिरवाळ हे आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेणार आहेत. सुनेत्रा पवार या प्रकरणाची सत्यता तपासणार आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक बोलावण्यात आली असून या बैठकीत नरहरी झिरवळांच्या प्रकरणाबाबत चर्चा होणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच नरहरी झिरवाळ हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेणार असल्याची माहिती आहे. दरम्यान या प्रकरणाचे धागेदोरे माझ्यापर्यंत पोहोचले तर मी राजीनामा देईन हे मंत्री झिरवाळ यांनी यापू्र्वीच स्पष्ट केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com