Ajit Pawar and Manikrao Kokate Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Manikrao Kokate : अजितदादांवर दबाव टाकण्याचा 'प्लॅन' रद्द : प्रचंड दबावातही कोकाटेंनी थांबवला 'पॉवर प्ले'

Manikrao Kokate on Ajit Pawar : कोकाटे यांच्या समर्थनार्थ त्यांच्या सिन्नर मतदारसंघातील जनतेने रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला होता. परंतु कोकाटे यांनी समर्थकांची समजूत काढल्यानंतर हा मेळावा रद्द झाला आहे.

Ganesh Sonawane

Manikrao Kokate : विधिमंडळात अधिवेशनादरम्यान विधान परिषदेत जंगली रमी खेळताना आढळल्याप्रकरणात कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर पक्षाकडून कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यासंदर्भात येत्या मंगळवार (दि. २९) पर्यंत निर्णय घेतला जाईल असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छावा संघटनेचे नेते विजयकुमार घाडगे यांना दिले आहे. त्यामुळे कोकाटे यांच्या मंत्रीपदावर आता टांगती तलवार आहे. त्यांचा राजीनामा घेतला जाईल अशी चर्चा आहे.

कोकाटे हे नाशिकच्या सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. वादात सापडलेल्या कोकाटे यांच्या समर्थनार्थ त्यांच्या सिन्नर मतदारसंघातील जनतेने रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला होता. रमीच्या डावावरुन कृषिमंत्री अडचणीत आलेले असताना आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना सिन्नरमध्ये आज (दि. २६) कोकाटे यांचे समर्थक शक्तिप्रदर्शन करणार होते. आज सिन्नर बस स्थानकावर एकवटण्याचं कोकाटे समर्थकांकडून आवाहन करण्यात आलं होतं. मात्र माणिकराव कोकाटे यांनी समजूत काढल्यानंतर समर्थकांनी स्वतहून बोलवलेला हा मेळावा रद्द केला आहे.

शक्ती प्रदर्शन करायची गरज नाही, अजित पवारांवर माझा विश्वास आहे असं कोकाटे यांनी म्हटलं आहे. तसच माझ्या खात्यात एक रुपयाचा ही भ्रष्टाचार नाही, शिवाय राज्यात तिसऱ्या क्रमांकाचे खाते म्हणून माझ्या विभागाचं काम चालतं. असं म्हणत कोकाटे यांनी समर्थकांना मेळावा घेऊ नका म्हणून समर्थकांची समजूत काढली. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांच्या समर्थनार्थ सिन्नरमध्ये होणारा आजचा मेळावा रद्द झाला आहे.

दरम्यान कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा न घेता खातं बदलून त्यांना वादग्रस्त वक्तव्यं आणि व्हिडिओप्रकरणी शिक्षा दिली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र कोकाटेंना मंत्रिपदावरून हटवावं की त्यांचं खातं बदलावं याबाबत अजित पवार गटात दोन मतप्रवाह असल्याची माहिती कळते आहे. आधी धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला. आता कोकाटेंनाही काढलं तर पक्षाच्या प्रतिमेला धक्का बसेल असं काही ज्येष्ठ नेत्यांचं म्हणणं आहे.

तसेच कोकाटे यांचा राजीनामा घेतला तर रोहित पवार आणि अन्य विरोधकांच्या दबावाला आपण बळी पडलो असा संदेश जाईल, असाही एक प्रवाह आहे. तर दुसरीकडे मंगळवारी कोकाटे यांचा राजीमाना घेतला न घेल्यास छावा संघटनेचे नेते विजयकुमार घाडगे यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यामुळे आता मंगळवारच्या बैठकीत काय निर्णय होतो ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT