Manikrao Kokate Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Manikrao Kokate politics: कृषिमंत्री कोकाटे यांचे विमान जमिनीवर... शेतकरी कर्जमाफीवर भूमिका बदलली!

Manikrao Kokate;Agriculture Minister Kokate came to the ground, changed his stance on farmer loan waiver-शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींना कर्जमाफी बाबत मुख्यमंत्र्यांची चर्चा करण्याचे दिले आश्वासन.

Sampat Devgire

Manikrao Kokate News: कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आता शेतकरी कर्जमाफी प्रश्नावर जमिनीवर आले आहेत. नाशिक येथे शेतकरी संघटनांशी चर्चा करताना या विषयावर मुख्यमंत्र्यांची बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे कृषीमंत्र्यांना या प्रश्नाचे गांभीर्य उमगले असावे.

शेतकरी कर्जमाफी प्रश्नावरून राज्यात राजकारण तापले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रश्नावर निवडणूक प्रचारात आश्वासन दिले होते. मात्र सत्ता येताच त्यांनी आपली भूमिका तात्काळ बदलली. या उलट ३१ मार्च अखेर सर्व शेतकऱ्यांनी कर्ज भरावे, असे आवाहन पवार यांनी केले होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या या भूमिकेमुळे विरोधी पक्षांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले होते. या विषयावर काँग्रेस पक्षाने नागपूर सहकारी ठिकाणी आंदोलन देखील केले. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने महायुती सरकारला कर्जमाफीच्या प्रश्नावर थेट आव्हान दिले होते.

या प्रश्नावर कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी मात्र थेट प्रश्नकर्त्यांनाच झिडकारे होते. हा विषय आपला नाही, असे त्यांनी वारंवार सांगण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे शेतकरी संघटना तसेच विविध शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना टार्गेट केले होते.

आता कृषिमंत्री कोकाटे या विषयावर जमिनीवर आले आहेत. मी आपल्या भूमिकेपासूनही यु टर्न घेतला आहे. राज्यभर गाजत असलेल्या कर्जमाफीच्या प्रश्नावर कृषी मंत्री यांनी भूमिका बदललेली आहे. शेतकरी कर्जमाफी बाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन देत विरोधकांना चुचकारण्याचा प्रयत्न केला.

महायुतीचे सरकार राज्यात प्रबळ बहुमताने सत्तेवर आले आहेत. हे सरकार निवडणुकांमध्ये दिलेल्या आश्वासनांनी चांगलेच बेजार झाले आहेत. विशेषतः लाडकी बहीण योजनेने सरकारच्या तिजोरीवर चांगलाच ताण निर्माण केलं आहे. त्यामुळे विरोधी पक्षांचं शेतकऱ्यांमध्येही महायुती सरकार विषयी नाराजीची भावना तयार होऊ लागली आहे. कदाचित याचीच जाणीव झाल्याने कृषिमंत्री कोकाटे यांचे विमानही जमिनीवर उतरले आहे. आता या विषयावर नरमाईची भूमिका घेत शेतकऱ्यांना चुचकारण्याचा प्रयत्न केला आहे.

-------

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये Number One डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातील नवी झेप

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT