Nashik Satpir Dargah : नाशिकमध्ये तणावपूर्ण शांतता...'या' कारणांमुळे दगडफेक पूर्वनियोजित असल्याचा संशय बळावला

Nashik Satpir Dargah Tension, Stone Pelting Conspiracy : जमावाला भडकावून चिथावणी देणाऱ्या संशयितांचा पोलिस शोध घेत आहेत. दरम्यान परिसरातील पोलिस बंदोबस्त कायम असून काठे गल्ली सिग्नल ते नागजी सिग्नल पर्यंतचा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे.
Nashik Dargah Demolition
Nashik Dargah DemolitionSarkarnama
Published on
Updated on

Nashik latest News : नाशिकच्या काठे गल्ली सिग्नलजवळ असलेला सातपीर दर्गा हे धार्मिक स्थळ हटवण्यावरुन मंगळवारी (ता. १५) मध्यरात्री झालेल्या दगडफेक व दंगलीप्रकरणी नाशिक पोलिसांनी आतापर्यंत ३० संशयितांसह एका अल्पवयीन संशयिताला अटक केली आहे. दरम्यान नाशिकमध्ये तणावपूर्ण शांतता असून जुन्या नाशिकला पोलिस छावणीचे स्वरुप आले आहे. संवेदनशील भागात राज्य राखीव दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. 19 एप्रिल ते ०३ मे पर्यंत शहरात मनाई आदेश लागू करण्यात आला आहे.

महापालिकेने येथील अनधिकृत बांधकाम हटविल्यानंतर या भागात मोठा तणाव निर्माण झाला होता. बांधकाम हटविण्यापूर्वीच जमावाकडून पोलिसांवर जोरदार दगडफेक करण्यात आली. अनेक पोलिस त्यात गंभीर जखमी झाले होते. जखमी पोलिसांना रुग्णालयातून डिस्चार्च देण्यात आला आहे. यातील अमंलदार फरीद इनामदार यांच्या पायावर खासगी रुग्णालयात शस्रक्रिया करण्यात येणार आहे.

Nashik Dargah Demolition
Sanjay Raut on Raj Thackeray : किती वेळा कपडे बदलणार? कधी हिंदू कधी बिंदू, कधी.., संजय राऊत यांचा राज ठाकरेंना टोला

दरम्यान घटनेनंतर काही अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवरुन दिलेल्या माहितीवरुन दगडफेक पूर्वनियोजित असल्याच्या संशय अधिक बळावला आहे. कारण दगडफेक होण्याआधी या भागातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. या भागात पोलिसांनी काही सीसीटीव्ही लावले होते ते गायब झाले आहेत. एका औषध दुकानाच्या सीसीटीव्हीच्या वायरी तोडलेल्या आढळून आल्या. दगडफेकीसाठी जे दगड वापरण्यात आले ते बांधकामात वापरल्या जाणाऱ्या कॉंक्रिट स्टोन आहेत. या भागात कोणतेही मोठे काम सुरु नसताना मोठ्या प्रमाणात कॉन्क्रिट स्टोन आले कुठून असा प्रश्न पोलिसांना पडला आहे.

दरम्यान पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सांगितले की अनेक जण याठिकाणी दुचाकीवर आले होते, ते पळून गेले मात्र त्यांच्या दुचाकी तेथेच राहिल्या. पोलिसांनी ९० पेक्षा अधिक दुचाकी जप्त केल्या आहेत. यातील काही दुचाकी धुळे व मालेगाव येथील असल्याचे प्राथमिक तपासात समोर येत असून दंगलीत शहराबाहेरील लोक आल्याचे यातून अधोरेखित होत असून पूर्वनियोजित कट असल्याशिवाय हे सगळे लोक बाहेरुन शहरात येणे शक्य नाही, त्यादृष्टीने पोलिस तपास करत आहे.

Nashik Dargah Demolition
Devendra Fadnavis Politics: देवेंद्र फडणवीसांच्या 'त्या' कार्यक्रमाने संपत सकाळे, विनायक माळेकर यांचा करेक्ट कार्यक्रम?

अटक करण्यात आलेल्या संशयितांना १९ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. जमावाला भडकावून चिथावणी देणाऱ्या संशयितांचा पोलिस शोध घेत आहेत. दरम्यान परिसरातील पोलिस बंदोबस्त कायम असून नाशिकच्या काठे गल्ली सिग्नल ते नागजी सिग्नल पर्यंतचा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे.

तसेच जमावाकडून झालेल्या दगडफेकीत आजूबाजूच्या व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दगडफेकीमुळे दुकानांचे फलक, सीसीटीव्ही, कॅमेरे, बॅनर, रोलिंग शटरचे नुकसान झाले आहे. तसेच दोन दिवसांपासून दुकाने बंद असल्याने व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com