Chhagan Bhujbal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Maratha Reservation News : येवल्यातील कार्यकर्ते मशाल घेऊन निघाले रायगडावर!

Manoj Jarange Patil Hunger strike, agitation is on in Yeola-मराठा आरक्षणाचे आंदोलन शांत होऊ लागले असताना येवला मतदारसंघात मात्र आंदोलनाचा जोर कायम आहे.

Sampat Devgire

Yeola Maratha Reservation agitation : मराठा आरक्षणासाठीचे उपोषण मनोज जरांगे पाटील यांनी स्थगित केले आहे. मात्र, येवल्यात मुंडन, धरणे, साखळी उपोषण, गावबंदी सुरूच आहे. काल काही कार्यकर्ते मशाल घेऊन रायगडावर निघाले. त्यामुळे अन्यत्र आंदोलन शिथिल होत असताना छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघात त्याची धग कायम आहे. (Maratha reservation agitationgot huge support in Chhagan Bhujbal`sConstituency)

मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचा येवला (Yeola) मतदारसंघ मराठा आरक्षण (Maratha reservation) आंदोलनाच्या निमित्ताने यंदा राज्यभर चर्चेत आला आहे. राज्य शासनाच्या विनंतीनुसार दोन महिन्यांचा कालावधी दिल्यानंतरदेखील येथे आंदोलनाचा जोर कमी होताना दिसत नाही.

मराठा समाजाला आरक्षणासाठी २ जानेवारीपर्यंतची मुदत शासनाने दिली आहे. मात्र, तोपर्यंत समाजाची मागणीची तीव्रता आणि आक्रोशाची भावना कायम राहावी, यासाठी मराठा समाजाच्या तरुणांनी रायगड ते येवला आणि येवला ते अंतरवाली सरटी अशी मशाल जागर यात्रा सुरू केली आहे. या यात्रेचे शनिवारी ममदापूर येथे उत्साहात स्वागत झाले. आरक्षणाच्या मागणीसाठी ममदापूर येथे साखळी उपोषण सुरूच आहे. त्यात विविध युवकांचा वाढता सहभाग आहे.

येवला तालुक्याच्या पूर्व भागातील सर्व गावामधून मशाल पदयात्रा फिरविण्यात आली. उत्तर पूर्व भागातील २६ गावांच्या आंदोलनाचे केंद्रबिंदू असलेल्या ममदापुर, राजापूर येथे मशालीचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. या वेळी विलास जाधव, भागवत सोनवणे, दीपक गुडघे, डॉ. हरिश्चंद्र राऊत, प्रकाश गुडघे, विजय गुडघे आदींसह विविध पदाधिकारी त्यात सहभागी झाले.

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा दर्शविण्यासाठी अंदरसुल गावातील सकल मराठा समाज बांधवांनी अंदरसुल येथे गेल्या चौदा दिवसांपासून साखळी उपोषण सुरू केले आहे. परंतु जरांगे पाटील यांना सरकारने दिलेला शब्द फिरवल्याच्या निषेधार्थ येथे नाशिक - छत्रपती संभाजीनगर महामार्गावर शनिवारी सकल मराठा समाजातर्फे रास्ता रोको करून मुंडन करण्यात आले.

एकंदरच राज्यात मराठा आरक्षण आंदोलनाची धग कमी होऊ लागली असताना, राज्याचे अन् व नागरी पुरवठा मंत्री, तसेच ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघात मात्र आंदोलनाची धग कायम आहे. किंबहुना ती कायम ठेवण्यासाठी सर्व प्रयत्न सुरू आहेत. त्यातून एक वेगळाच राजकीय व सामाजिक संदेश देण्यात येत आहे. त्यामुळे येवल्यातील आंदोलन चर्चेचा विषय बनले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT